भारतात कोणताही सण , वार फक्त साजरा करण्याची एक घाण सवय लागली आहे. आम्हाला फक्त सण साजरे करता येतात तो सण वार का साजरा करतात ? त्याचा इतिहास काय ? भविष्य काय ? कोणी सुरू केला ? त्यातल चांगलं काय वाईट काय ? असले प्रश्न विचारायची सवय कधी भारतीयांना लागणार देव जाणे !
आज 26 जानेवारी म्हणजे स्वतंत्र दिन नाही ! हे 90 टक्के भारतीयांना माहीतच नाही ...फक्त आम्ही शाळांच्या आणि सरकारी कार्यालयात जाणार सॅल्युट मारणार ,काही खायला भेटलं तर ठीक आहे नाहीतर येणार हात हलवत परत...
15 ऑगस्ट म्हणजे भारताला फक्त राजकीय स्वतंत्र मिळाले तो दिवस . इंग्रज 1947 ला गेले म्हणून राजकीय नेते आनंदी होते ..
गरिबांना काय मिळाल ? शोषितांना काय मिळालं ? दलितांना काय मिळाल ? शेतकरी , स्त्रियांना काय मिळालं ? या सर्व घरकांना न्याय , हक्क ,देण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950
26 जानेवारी म्हणजे भारतीयांना लोकशाही , सार्वभौमत्व , संविधान आणि आर्थिक , सामाजिक स्वतंत्र वयक्तिक स्वतंत्र आणि हक्क मिळण्याचा दिवस ..याच दिवशी डॉक्टर आंबेडकरांच्या हातून भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संविधान स्वीकारले आणि अंगीकृत केले .
26 जानेवारीने भारताला काय दिल ?
1) निवड प्रक्रियेत सर्व 18 वर्षावरील भारतीयांना सहभाग घेण्याची संधी !
2) 1 मत 1 मूल्य ( अंबानी आणि रस्त्यावरच्या भिकार्याच्या मताचे मूल्य एकच )
या गोष्टीची किंमत भारतीयांना 75 वर्षानंतर कळली का नाही हा प्रश्न आहे ?
3) भारतभर राहण्याची , फिरण्याची , भाषणाची , आंदोलन करण्याची , लिहण्याचे स्वतंत्र !
4) " आज लोकशाहीला मुजरा करती रंक आणि राव "
( सर्वांना कायदा समान लागू करण्यात आला राजेशाहीचा आधीकृत अंत ह्या दिवसापासून झाला )
5) जातीवाद , untochability चा अंत म्हणजे 2000 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांना सुरुंग लावण्यात आला..
6) जाती - धर्म - लिंग यावरून कोणाला कमी लेखता येणार नाही !
7) "समानतेचा हक्क "
8) कलम 19 अंतर्गत वयक्तिक स्वतंत्र .
9) (freedom of Expression ) भाषण , लिखाणातून व्यक्त होण्याचे स्वतंत्र ...
10) गरीब आणि दुर्बल घटकांसाठी विशेष तरतुदि !
11) अल्पसंख्याक समाजाला संरक्षन
12) Sc St आरक्षण
13)महिलांच्या शिक्षणासाठी विशेष तरतुदी !
14)प्राथमिक शिक्षण मोफत !
पीडित , गरीब , शोषित ,स्त्रिया , यांच्या साठी हा दिवस "सोन्या " प्रमाणेच...
भारतिय म्हणून आपण आज काँग्रेस ,नेहरू , आणि आंबेडकरांना धन्यवाद म्हणण्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी ..
शेवटी 26 जानेवारी पासून
तिरंगा झालाय नामी !
त्याला साऱ्या देशाची सलामी !
कार्य भीमाच आलंय कामी !
Comments
Post a Comment