आज छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिन महाराष्ट्र साजरा करतोय , पण हा राज्याभिषेक साजरा करत असताना डाव्या आणि उजव्या इतिहास संशोधकांनी कायम संभाजी महाराजांवर कसा अन्याय केला याचा आपण मागोवा घेणार आहोत..
1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?
वाचण्यासाठी धन्यवाद ! आभारी आहे !
1) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?
2) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ?
3) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ?
4) संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ?
१) संभाजी महाराजांनी खरच हिंदू धर्मासाठी बलिदान दिल ?
संभाजी महाराजांच्या जयंती , पुण्यतिथी , आणि राज्याभिषेक आला रे आला हिंदुत्ववादी संघटनाकडून महाराज कसे '' धर्मरक्षक '' होते याचा प्रचार आणि प्रसार केला जातो , आणि दुर्दैवाने ह्या प्रचारास महाराष्ट्र बळी पडला अस आपल्याला बोलावं लागेल..धर्मरक्षक महाराज होते याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे , पण इतिहास हा कधीच चांगला किंवा वाईट नसतो ,
''इतिहास हा इतिहास असतो '' आणि इतिहासात या धर्मरक्षक ''उपाधी वर कोणताही समकालीन पुरावा ना मराठा दस्ताऐवजा मध्ये आहे ना , औरंगजेबाच्या दरबारात आहे .आणि दरवेळी प्रमाणे ब्राह्मण इतिहासकारांच्या भरणा ,हे दुर्दैव महाराष्ट्रच की इतिहास संशोधक हे इतिहास संशोधक नसून राजकीय पक्षांना बांधलेले पाळीव प्राणी आहेत , जसा इतिहास पाहिजे तसा इतिहास हे संशोधक लिहून देतात ..आणि ही मिथक सबशेल खोटी आहेत , हे सांगण्याच सामर्थ्य ह्या संशोधक मंडळी मध्ये नाही..
असो , माझे काही प्रश्न आहे , या प्रश्नाचे उत्तरे महाराष्ट्राने शोधावे ,
1) औरंगजेब खरच हिंदू धर्मातील राजांना धर्मपरिवर्तन करा , म्हणून माघे लागला होता तर , त्याच्या दरबारात असणाऱ्या ,मिर्झा राजे जयसिंग (राजपूत) आणि जसवंत सिंग यासारखे अनेक राजपूत , शीख, गुज्जर, मराठा, ब्राह्मण वकील , असतील तेव्हा औरंगजेब ने त्यांचं धर्मपरिवर्तन का केलं नाही ? संभाजी महाराजच का ?
2) संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने रायगड काबीज केला अनेक मराठा सरदार , शाहू महाराज(संभाजी महाराजांचे पुत्र) संभाजी महाराजांच्या पत्नी औरंजेबाने कैद केलेले होते , जवळ जवळ18 वर्ष ते कैदेत होते तेव्हा औरंगजेब ने त्यांचे धर्मपरिवर्तन का केले नाही ? संभाजी महाराज च का ?
यावर अनेक जण बोलतील तू औरंगजेब प्रेमी आहेस ..पण मित्रांनो आपण असा मिथकांवर आधारित इतिहास जेव्हा पुढच्या पिढीकडे जाईल , तेव्हा एक ना एक दिवस हा सगळा फुगा फुटणार आहे ...
२)) संभाजी महाराजांचा बदला खरच महारांनी घेतला ?
आंबेडकरी चळवळीतील तथाकथीत इतिहासकारांनी हे मिथक खूप हुशारीने पेरलं , आहे आणि डाव्यांनी खासकरून पिवळ्या इतिहासकारांनी promote करण्याच काम केलं आहे...आणि भीमा कोरेगाव चा इतिहास आणि जवकच वढू बुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आहे,
एका इतिहासाला दुसऱ्या इतिहासाशी जोडण्याच काम केलं आहे..
संभाजी महाराज यांचं निधन 1689 आणि भीमकोरेगाव ची लढाई 1818 महार समाजाने 130 वर्षाच्या नंतर इंग्रजांकडून लढून , पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करून 130 वर्षांपूर्वी झालेले संभाजी महाराजांचा बदला घेतला ? का ? कशामुळे ? गरज काय ? हे अनुउत्तरीत प्रश्न दावे आणि उजवे इतिहास संशोधक विचारायला भितात हे महाराष्ट्रच दुर्दैव ..
विशेष म्हणजे या खोट्या इतिहासावर गाणी सुद्धा आलेली आहेत .
३) संभाजी महाराजांना ब्राह्मणांनि मारलं ?
ब्राह्मणांनी औरंगजेबास सांगितलं की याने मुस्लिम धर्मास धोका केला , नाही परंतु आमच्या वैदिक धर्माशी धोका केला आहे कारण ..
:- संभाजीने समुद्र पर्यटन केले
:- स्त्रियांना समान वागणूक दिली
:- शेतकऱ्यांना पाणी दिले
हे आणखी एक मिथक ब्रिगेडी इतिहास कारांनी पेरलं आहे , यामध्ये श्रीमंत कोकाटे यांच नाव अग्रस्थानि आहे .संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी पकडून देऊन ,त्यांनी ' ' ' बुधभूषण ' हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहला म्हणून , ब्राह्मणांनानी औरंगजेबास सांगून , संभाजी महाराजांची क्रूर हत्या करायला लावली..
ह्या कोणत्याही इतिहासाला पुरावा नावाची गोष्ट आजतागायत भेटली नाही.
ब्राह्मणांची बदनामी हेच काही ते निमित्त..
मला मान्य आहे की संभाजी महाराजांच्या दरबारातील ब्राह्मणांनी गद्दारी केली , पण ती जाती मुळे नव्हे , अशा प्रउत्ती प्रत्येक समाजात वावरताना दिसतात..
४)संभाजी महाराज आणि गुढीपाडवा ?
संभाजी महाराजांच्या हत्या ही गुढीपाडवा च्या दिवशी झाल्यामुळे , ब्राह्मणांनी त्या दिवसापासून गुढीपाडवा हा सण साजरा करतात.त्यामुळे मराठी माणसांनी गुढीपाडवा सण साजरा करू नये ..कारण गुढीच्या वरती तांब्या लावतात तो संभाजी महाराजांचे मुंडके आहे , लिंबाचा पाला आपण देहाची माती झाल्यानंतर वापरतो तोच लिंबाचा पाला आपण गुढीपाडव्याला वापरतो ..संभाजी महाराजांच्या क्रूर निधनानंतर ब्राह्मण हातात एक बांबू आणि त्यावर संभाजी महाराजांचे मुंडके घेऊन आनंदाने नाचत होती व त्या दिवसापासून महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जातो ...
मुळात गुढीपाडवा सण ला हजारो वर्षांपासून चा इतिहास आहे .. महाराष्ट्रातील सातवाहनांनी शकांचा केलेला पाडावापासून इसवी सन 75 पासून आपण गुढीपाडवा सण साजरा करतो , रामाचा आणि गुढीपाडवा सणाचा सुद्धा काही संबंध नाही हे इतिहासकारांनी वारंवार लिहले आहे ..असो तो इतिहास आपण एका वेगळ्या ब्लॉग मध्ये सांगतो ...
हे म्हणजे किती अति केलाय ह्या इतिहासकारांनि देव जाणे , विशेष म्हणजे हे इतिहासकार आज समाजात वावरताना ह्या गोष्टींचा अभिमान आहे असे बोलत फिरतात, अमोल मीटकरी , आंधळे बाई, ह्यांनी तर आंबेडकरी विचार मंचावर जाऊन तोंडातून वाटेल ते संभाजी महाराजांवर बोलले आहेत ..
ह्याचा छुपा हेतू संभाजी महाराजांना डाव्या चळवळीची जोडून घेऊन ,ब्राहमण आणि मराठा समाजाच सामाजिक खच्चीकरण करणे हेच ..
संभाजी महाराजांच्या वर खरच प्रेम करणारे आणि मराठ्यांच्या इतिहासावर निष्ठा असणाऱ्या मावळ्यांनी डाव्या आणि उजव्या चळवळी पासून फारकत घेऊन इतिहास हा इतिहास म्हणून वाचवा ..
जशी पंढरपूर च्या विठ्ठलाची मिथक वेळेनुसार बनली त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची कृपया करून मिथके बनून देऊ नका !
पुरावे ,चाचपणी न करता फक्त आपल्या चळवळीला आणि पक्षांना कसा फायदा होईल हे पाहनारे आपले नेते आणि इतिहासकार ....
Comments
Post a Comment