आज शेतकऱ्यांची पोर संभ्रमाच्या अवस्थेत आहेत शेतीला भाव नाही ! नोकरी नाही ! कराव तर काय करावं ! हा मोठा गहन प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांच्या समोर आहे...यासाठी पर्याय आणि शेतीचे भविष्य पाहून मी a
हा" business plan " शोधला आहे ..
यासाठी आपल्याला
1) 1 एकर सुपीक जमीन ,
2) ठिबक सिंचन ,
3) 200 कॅरेट
4) किमान 10 गुंठामध्ये polyhouse , सुरुवातीच्या एक वर्षात नसेल तरी चालेल, पण दुसऱ्या वर्षापासुन हवाच ..
5) social media instagram, facebook ,email marketing करता याव!
6)लहान रोटावेटर..
7) छोटा हत्ती टेम्पो
8) शेणखत / कोंबडीखात/ लेंडीखात
9) काही पिकांसाठी कुंड्या किंवा प्लॅस्टिक कुंड्या लागतील.
10) गावरान बी (देशी बियाणे )
1) सुरुवातीला एकर क्षेत्रावर नांगरणी , करून 3 टायली शेणखत टाकून घ्यावा ...
2) नंतर , 1 एकर (म्हणजे 40 गुंठे ) या सर्वांचे 9×5 गुंठे = बरोबर 45 गुंठे याप्रमाणे 9 भाग पाडावे ...
3) त्यानंतर कोथींबीर , शेपू , वांगी ,दोडका , कांदा ,
मिरची ,पालक , मेथी , भेंडी , आणि गवार
4) या 9 पालेभाज्या आणि फळभाजी यांची अशाप्रकारे लागवड करून घ्यावी ,जेणेकरून 200 कुटुंबांना पुरेल अशाप्रकारे सऱ्या काढून घ्याव्यात..
5)एक एकर जास्ती असेल तर कांदा आणि काही प्रमाणात लसूण करून साठवण करून ठेवला तर दुधात साखर .
6) या नऊ भाज्या आणि बाजारातून उपलब्ध असणाऱ्या भाज्या (ताज्या) असणं खूप महत्त्वाचं आहे..
7) तुमच्या भागात होत असणाऱ्या आठवडी बाजाराच्या 2-3 दिवस आधी , social media वर विडिओ किंवा पोस्ट करणे गरजेचे आहे..
8) कारण ह्या business मध्ये (ताजेपणा ) आणि घरपोच सेवा हाच वेगळेपना आहे..
9) सर्वात आधी माझा सल्ला असेल की , स्वतःच्या गावात शक्यतो हा धंदा करू नका ..कारण उधारी होण्याची शक्यता जास्त आहे..
10 ) आणि शेवटी सकाळी लवकर उठून( 5 वाजता) सर्व भाज्या तोडून व्यवस्थित पाण्याने स्वछता करून..(कोथिंबीर )सारख्या भाज्या धुऊन त्यांचे टेठ कापून केळीच्या किंवा कापडाने बांधून ग्राहकाच्या घरी ह्या सर्व भाज्या 2 तासाच्या आत काढल्या पासून पोहचवणे गरजेचे आहे..म्हणजे सकाळी 7 -8 च्या (दरम्यान).
11) सुंदर पॅकिंग , branding , आणि गृहिणींना जास्तीच्या भाज्या स्वच्छ करणे , गहाण बाजूला काढणे , (देठ ) काढणे , या वेळ घालवणार्या कामापासून सुट्टी देणे , हा उद्देश असणे महत्त्वाचे आहे...
12) कॅरेट * च महत्व या business मध्ये खूप आहे , कारण , ग्राहकांच्या हातात 2 तास आधी काढलेली ताजी , ऑरगॅनिक , आणि गावरान भाजी जी सुंदर ब्रँडिंग आणि स्वछते सोबत एक कॅरेट मध्ये येत असेल तर , आणखी शोभा आणि आपल्याला ते डिलिव्हरी देण्यास सोपं जाईल ..
वेळोवेळी मशागती साठी लहान रोटर असणे गरजेचे आहे..ग्राहकांना आम्ही chemical खत वापरत नाही ,फक्त कंपोस्ट , शेणखत , organic खते वापरतो हा विश्वास देणे , social मीडिया वर वेळोवेळी watsapp , facebook , instagram वर विडिओ टाकून मार्केटिंग करणे सहज शक्य आहे..
(त्यामुळे मी सुरुवातीला social मीडिया मार्केटिंग चा उल्लेख केला आहे...)
होम डिलिव्हरी देण्याच्या अगोदर जुन्या ग्राहकांशी phone वरून चर्चा करून" अभिप्राय "आणि prebooking केलं तर , अधिकचा डिस्काउंट देने हे या धंद्यातील पॉझिटिव्ह बाजू असेल..
हाच business का ???यशस्वी होणार ??
असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे...याची कारणे :-
1) chemical खतांच्या वाढलेला वापरामुळे orgainc खता चे कळलेलं महत्व..
2) गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी नवीन तयार झालेला , सुशिक्षित आणि पैसा असणारा नवीन वर्ग .
3) गावरान बियानांचा वापर ,(Quality over Quantity )
4)ताज्या भाज्या 2 तासाच्या आत ग्राहकांच्या जवळ गेल्यामुळे (customer loyalty वाढणे , सहज शक्य आहे )
5)चांगल्या ब्रँडिंग ,स्वछता, मूळ गृहिणींना कामातून सुट्टी
6) शेतकरी ते ग्राहक यामुळे शेतकऱ्यांचा फायदा .. .
आर्थिक नियोजन आणि अंदाजे मिळणारा पैसा.
1)1 कॅरेट चे गणित , वांगी अर्धा किलो = 30 , कोथिंबीर 2जुडी = 25 रुपये , पालक =12 रुपये , मिरची =60 रुपये अर्धा किलो ,
भेंडी =40 रुपये अर्धा किलो , मेथी 15= रुपये जुडी, शेपू =15 रुपये जुडी , दोडका 3 नग =30 रुपये , टोमॅटो 20 रुपये अर्धा किलो ..बटाटा एक केली 25-30 रुपये (बाजारातुन घेऊन येऊन स्वच्छ धुऊन विकणे ) असे एकूण सुरुवातीला 100 कॅरेट = 200 ×100 = 20000 एक वर्षानंतर 200 कॅरेट सहज शक्य आहे ..
ह्या सोबत च तूप , दूध, दही, फळे, गावरान अंडी, मासे , गावरान कोंबडी विकणे social मीडिया मुळे सहज शक्य आहे...
Comments
Post a Comment