आज आपण globalization च्या युगात जगात आहोत .यामुळे महत्वाचे बदल म्हणजे इंग्रजी भाषेला आलेला अनन्य साधारण महत्व त्याच बरोबर येणाऱ्या संधी सुद्धा वाढत आहेतच ,

महाराष्ट्र सरकारचे प्रताप !


पण ,सध्या महाराष्ट्रात मराठी शाळा ज्या शाळांनी सुसंस्कृत , शिस्तबध्द , हुशार , आणि कर्तगार पिढ्या तयार केल्या आज त्याच मराठी शाळा महाराष्ट्रामध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ,
याच एकच कारण म्हणजे शासनाने केलेले सपशेल दुर्लक्ष ..
मला तुम्हाला एक GR दाखवायचा आहे !
महाराष्ट्र सरकारचे प्रताप !
१) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १० किंवा १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणे बाबत .
२) हा सादर प्रेसनोट २६ /११ म्हणजे निवडणूक झाल्यानंतर गलेच काढली आहे .
३) पहिला मुद्दा : ही भरती पूर्णतः कंत्राटी पद्धतीने असेल.
४) २ रा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे , त्यात लिहल आहे , ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने असल्यामुळं कोणत्याही शासनाच्या लाभाचा म्हणजे ( पीएफ , allownce , भरपगारी सुट्ट्या , आणि इतर कोणतेही लाभ भेटणार नाहीत )
५) नशीब आरक्षणानुसार वयाची आट तरी आहे 😄.
६)ह्या नियुक्तीचा कालावधी १ वर्षाचा असणार.
७)पगार फक्त १५००० असणार..
म्हणजेच शेवटी सरकारने खाजगीकणाच्या कामाला सुरुवात केलीच ..
दीपक केसरकर यांनी स्वतः मान्य केलं आहे की ,' मराठी शाळा बंद पडत आहेत ''
याची मुख्य कारणे ?
१) infrastructure :-
मराठी शाळांचे infrastructure इंग्रजी शाळा प्रमाणे up to date नाही . याला सर्वस्वी जबाबदार शासन आहे .
२) पालकांमध्ये तयार झालेली निराशा जनक मानसिकता :-
मराठी शाळांचे शिक्षक चांगले शिकवत नाहीत , इंग्रजी भाषेला प्राधान्य देत नाही , अशा प्रकारे पालकांच्या मनात मराठी शाळांच्या बद्दल उदासीनता निर्माण झाली आहे ,
मुळात याची सुरवात २०१२ पासून गावात झाली आहे .
३) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे झालेले दुर्लक्ष :-
इंग्रजी शाळेमध्ये मुलांच्या अभ्यासाच्या तुलनेत सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते , जस की कॉम्प्युटर knowledge , public speaking , grooming ,
त्या. तुलनेत मराठी शाळांच्या मुलांकडे लक्ष दिले जात नाही .
४) मराठी शाळांचे शिक्षक :-
मराठी शाळाचे शिक्षक भरपूर पगार घेतात पण काम करत नाही , हे वाक्य ग्रामीण भागात सहज वापरले जाते. ऐतखाऊ हा शब्द मराठी शाळांनच्या शिक्षकासाठी समानार्थी शब्द असल्या सारखा वाटावा अशी परिस्थिती आहे ,
५) इंग्रजी शाळेमध्ये मिळणाऱ्या सुविधा :-
आज इंग्रजी शाळा मुलांना इंग्लिश सोबत चांगल्या सुविधा १) स्कूल बस २) चांगली कपडे ३) विविध कार्यक्रम यामुळं मराठी शाळा नकोशा झाल्या आहेत .
या सगळ्यांवरचा उपाय :-
१) शिक्षकांचे प्रशिक्षण :-
बदलत्या काळानुसार मराठी शाळांनी कात टाकन गरजेचं आहे , शिक्षकांना नवीन तंत्रज्ानाद्वारे प्रशिक्षण देणे आज गरजेचं आहे ,
१) AI (artificial intelligence)
२)excel
३) power bi
४) SQL
५) class room app
६)zoom
७)sports
८)computer knowledge
९) English speaking
१०) हिंदी भाषा
यासारख्या नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे .
मराठीशाळा नी अनेक पिढ्या
१)संस्कृती २) मर्यादा ३) संस्कार ४) परंपरा
५) थोरांचा आदर ६)पुस्तकातलं नव्हे जीवनाचं शिक्षण ज्या मराठी शाळांनी दिलं , त्या शाळांवर वाईट वेळ येणं हे मनाला १००० ईंगल्या डसल्याच दुःख मनाला देऊन जात .
विद्यार्थ्यांना शिक्षा (छडी) करण्याची परंपरा पुन्हा सुरू करणे :-
आज काल आपण पाहतोय विद्यार्थी हे शिक्षकाचे मित्र झाले आहेत , भीती नावाची गोष्टच राहिली नाही .
शाळेच्या पहिल्या दिवशी गावातील सर्व पाल्यांनी मराठी शाळेत मीटिंग घेऊन आमच्या मुलाला भरघोस शिक्षा करा , अस त्या विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे ...
इंग्रज स्कूल मुलांना business म्हणून पाहतात , ते कधीही त्यांना मारू शकत नाही ..
आज जे संस्कृती आणि मर्यादेच नैतिक पतन मोबाईल फोन ने केलं आहे , अस बोलताना पालकांनी विसरू नये की यामध्ये ५०% वाटा हा बंद झालेल्या माराचा आहे .
आपण हल्ली सहज बोलून जातो मुल ,आईकत नाहीत तेव्हा ,मला हसू येतो , एका चापटी मध्ये मुलांच्या डोळ्यातून पाणी काढणारे आमचे शिक्षक आठवतात त्या पाण्यासोबत मुलांना , माणसांचा मान करायचा असतो , उलट बोलू नये , आणि मर्यादेची जाणिव करून देणारे आमचे शिक्षक आठवत ..
आज परत एकदा ' छडी लागे छम छम ' चा आवाज मराठी शाळांमधून यायला हवा , आणि याला पालकांची साथ भेटन गरजेचं आहे .
मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना आता tye आणि blazzer ची सवय ही लावायला हवी .
शासनाने infrastructure वर विशेष भर देणे गरजेचे आहे ...
अधिक माहितीसाठी bhoreChetan२०२@Gmail .com वर संपर्क करा ..
Comments
Post a Comment