Skip to main content

मराठ्यांच्या आरक्षणाचे खरे मारेकरी ?

शेवटी मराठ्यांसाठी जरांगे पाटिलच बरोबर! 



अशी म्हणायची वेळ का आलेली आहे ..हे आपण या blog मध्ये पाहनार आहोत  ..

डाव्या आणि उजव्या चळवळीने मराठ्यांच पानिपत कशाप्रकारे याचा इतिहास 1950 पासून 2025 पर्यंत पाहणार आहोत...

पंजाबराव देशमुख , अण्णासाहेब पाटील , विनायक मेटे ते जारांगे पाटील ...मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात याचिका दाखल करणारे बाळासाहेब सराटे किंवा विनोद पाटील असो .....
वारंवार प्रयत्न करून सुद्धा राज्यकर्त्यांची मराठा आरक्षणाबद्दलची उदासीनता आणि मराठा विरोधी गटाने बांधलेली एकजुटीने मराठ्यांना हक्काचं असणार ओबीसी आरक्षणापासुन वारंवार मुकाव लागलं...

                

कारण , विस्थापित मराठा समाज अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या दावणीला नंतर शिवसेना सारख्या हिंदुत्ववादी संघटनेचे कडे नामांतराच्या मुद्यावरून गेला .

शरद पवारांनि कायम मराठा समाजाचा उपयोग हा ''टोपल्यातल्या भाकरी " प्रमाणे केला ..आणि शिवसेनेने हातात भगवे झेंडे देऊन मुस्लिमांच्या विरुद्ध वापर केला ..2014 नंतर मराठा समाज भाजप कडे शरद पवार आणि काँग्रेस ला कंटाळून आला..आणि परत तेच फडणवीस यांनी 2018 च्या शेवटी दिलेलं आरक्षण परत सुप्रीम कोर्टामध्ये तोंडावर आपटलं आणि मराठा समाजाची परत निराशा झाली..


             पण या काळात आरक्षणामूळ मराठा समाजाच्या 3-4 पिढ्या अक्षरशः चराचरा कापल्या गेल्या , कारण शिक्षणात आरक्षण नसल्याने ओपन च्या जागा कमी आणि त्यात भरमसाठ फी आणि मेरिट लिस्ट  यामुळे 1990-2019  या 30 वर्षात भारताने स्वीकारलेल्या ग्लोबलायझेशनच्या धोरणामुळे शेती व्यवसाय रसातळाला गेला आणि त्याच बरोबर seiling चा कायदा इंदिरा गांधींनी आणल्यामुळे व शेतीची झालेल्या विभागणी मुळे मराठा समाजाला 
'' तोंड दाबून बुक्यांचा मार भेटला '' ही परिस्थिती हळू हळू नवीन पिढीला कळायला लागली होती ..आणि मराठा समाज '' मराठवादि'' भूमिका स्वीकारनाऱ्या नेत्याच्या शोधात होता ..स्वर्गीय विनायक मेटे यामधील एक नाव होते पण ते मराठवाड्याच्या बाहेर आपलं प्रस्थ वाढू शकले नाहीत ..
               
(1994 gr when reservation in maharashtra increses to 35 to 50 without any  survey )
     ( 1994 चा GR शरद पवार)


ते 2019 पर्यंत 
मराठ्यांच्या साठी 2001 साली माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे  यांनी काढलेला मराठा कुणबी आणि 
कुणबी मराठा  हे OBC प्रमाणपत्र घेऊ शकतील याशिवाय कोणताही निर्णय मराठ्यांच्या पारड्यात पडला नाही ...


खत्री , राणे, गायकवाड, बापट ,आयोग आले आणि गेले काहींनी आरक्षणकडून बाजू मांडली तर काहींनि नाही
 

                      पण राज्यकर्त्यांनी कायम आरक्षण देण्याची वेळ आली की '' मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण  '' हा नवीन शोध लावला या शोधाचे जनक '' छगन भुजबळ ''आणि ''गोपीनाथ मुंडे ''होते हे सुद्धा मराठा समाजाला समजणे गरजेचे आहे..


याची सुरुवात 2008 -09 साली झालेली होती मराठा आरक्षण विरोधी गटांना पाठबळ मराठा नेत्यांकडूच मिळत होते ..यामध्ये भुजबळ , मुंडे, रावसाहेब कसबे , हरी नरके  यांनी पद्धतशीर पणे मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये किंवा स्वतंत्र मिळावे यासाठी प्रयत्न केले ..

रावसाहेब कसबे यांच अजरामर वाक्य आहे - 
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला obc मध्ये समावेश करण्याची प्रक्रिया शेवटला येऊन थांबली होती .2 मीटिंग सुद्धा झाल्या होत्या आणि तिसऱ्या मीटिंग मध्ये अशोक चव्हाण यांनी मागासवर्गीय अयोगामध्ये माझी (कसबे) ची निवड केली , आणि माझ्या एक विरोधी  मतांमुळे मराठयांना OBC आरक्षण मिळू शकले नाही ,त्यात मी खुंटी मारून ठेवली ..


https://youtu.be/PGheDareSXE?si=_A0A9nftEoG6QnBx
ही त्या विडिओ ची लिंक ...
(आणि हे कसबे महाशय छगन भुजबळ आणि शरद पवारांचे खास )

                  मला यावरून शरद पवार आणि अशोक चव्हाण यासारख्या मराठा नेत्यांच्या मराठा समाजाला आरक्षण भेटावे म्हणून किती उदासीन होते याची जाणीव मराठा समाजाला करून द्यायची आहे..
शरद पवार , अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण , विखे पाटील, थोरात ,मोहिते पाटील , यासारख्या अनेक तालेवार मराठा नेत्यांची निष्क्रियता आपणाला दिसून येते ..
                 

khatri commitee 2004
(वरील खत्री आयोगाचा अहवाल काय सांगतो पहा 2004 )मराठा  अरक्षणामध्ये ''खत्री आयोगाचे  '' महत्व अनन्यसाधारण आहे ..हा आयोग 1995 साली गठीत केला होता ..2004 साली हा आयोगाने महाराष्ट्र सरकारला अहवाल सादर केला ..

  2018 चे 53 मूक मोर्चे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी गायकवाड आयोग स्थापन केला . गायकवाड आयोगाने मराठा आणि कुणबी हे एकच आहेत असा अहवाल दिला .

सोबतच मराठा -कुणबी यावर स्वतंत्र 30 पानांचं प्रकरण आहे ,शिवाय मराठा-कुणबी हे एकच आहेत यावर 126 पुरावे अहवालात नमूद केलेले आहे...
अस असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र (SEBC )आरक्षणाचा घाट का घातला ? हा प्रश्न उरतो....

gaikwad commitee 2018
 2024 अखेरीस एकनाथ शिंदे यांनी नेमलेली शिंदे कमिटीने कुनबी प्रमाणपत्रा साठी नोंदी शोधण्यासाठी जवळ जवळ एक वर्ष प्रयत्न केले..जवळपास 8 लाख कुणबी प्रमाणपत्र एका वर्षात मराठ्यांच्या पदरात पडली आहेत हे आकडा वाढेल पण ..
पण शेवटी जा आकडा पुरेसा आहे का  ?
वाशी मधील एकनाथ शिंदे नि केलेला दगा ! मराठे विसरतील का ? 
tukaram maharaj abhang 


शेवटी मराठा समाजाला हाच प्रश्न पडतो ...
गाव सारा मामाचा पण एक नाही कामाचा !

Blog


learnmarketing9201.blogger.com

Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...