Skip to main content

शेतकऱ्यांची पोर ऑपशन ट्रेडिंग च्या विळख्यात ? आणि वास्तव ?

Option trading ! Option trading ! आणि option ट्रेडिंग !

2019 नंतर जसा कोरोना ची देशात साथ आली तशी अजून एक साथ भारतात आली ती साथ म्हणजे option trading ची..

ही साथ येण्यामागे प्रमुख 3 कारणे होती :
१) बिनकामाची तरुणाई .
2) 1992 scam webseries  .
3) influencer चा भरणा .

मुळात हा रोगाची चर्चा मुख्य माध्यमातून झाली नाही त्यामुळे , manipulation खूप प्रमाणात झाले.. आणि ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणाई याला बळी पडली...
                याची सुरुवात होते watsapp आणि telegram ग्रुप वर हजारो रुपयांची प्रोफीटचे स्क्रीनशॉट पाहून ,माझी सुद्धा काही वेगळी परिस्थिती


न्हवती..2021 चा नोव्हेंबर महिना ,जवळच्या मित्राने मला काही प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवले , त्याला traders '' टेलिग्राम कॉल्स '' अस म्हणतात ..म्हणजे टेलिग्राम च्या अडमिन ने ''call ''(म्हणजे मार्केट वाढेल )
'' PUT '' ( म्हणजे मार्केट पडेल ) अशा त्या शक्यता ग्रुप मध्ये  ''कॉल्स ' दिले जातात आणि आपल्याला त्या कॉल नुसार लगेच ते buy आणि sell करावे लागतात ...
सुरुवातीचे 3 दिवस 2000 ,1500, 1200 असा सलग तीन दिवस मला अगदी काही मिनिटांमध्ये प्रॉफिट झाला ..मला वाटल की आता काही दिवसात मी करोडपती होतो की काय !

पण मला पुढं येणाऱ्या काळ्या संकटाबाबत काहीच कल्पना न्हवती ..पण माझ्या नशिबाने त्या वेळेस माझे वय फक्त 18 वर्ष असल्याने माझ्याकडे खूप कमी पैसे होते म्हणजे अगदीच 10000-12000 त्यामुळे थोडक्यात वाचलो..४थ्या दिवशी 5000 रुपये लॉस पण , मला वाईट वाटलं नाही कारण , हे पैसे माज्यास्वतःचे न्हवते मार्केट मधून कमावलेलं मार्केट ला गेले अशी ती माझी समजूत..

             सुरुवातीच्या ह्या 3 चुका मीही केल्या ,
 १) stoploss  न लावणे 'मुळात मला stoploss म्हणजे काय हेच माहिती न्हवत .
२) ट्रेड वर loss मधून प्रॉफिट मध्ये येईल ह्या आशेवर तासन्तास थांबणं..यामुळे'' थिटा '' decay म्हणजे काय ? याची मला कल्पना नव्हती ! 
३) ट्रेड पुढच्या दिवसात घेऊन जाण ! ज्याला आपण carry forward म्हणतो !

                अस करत करत आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा माज्या अकाउंट मध्ये असणारे 10000 पैकी 8000रुपये  एका ट्रेड म्हणजे अगदी 5 मिनटाध्ये संपले , मी ते पैसे 2-3 महिने मजुरी करून कमावले होते...अगदी डोळ्यात पाणी आलं '' पण मी हार मानली नाही मी एक जॉब पहिला अगदी 9000 रुपये पगार वाला ठरवलं 5 महिने sharemarket शिकू आणि 40-45 हजारपासून सुरुवात करू..

                 प्लॅन चांगला होता ,पण मला याची कल्पना न्हवती की , मी ह्या मायाजाळा मध्ये हळूहळू अडकत चाललोय , Sharemarket मध्ये सुरुवात ही 


1)काही share घेऊन मार्केट च्या वेगाबद्दल कल्पना घेऊन (fluctuation ) समजून घेणे महत्वाचे आहे ..
(2-3 महिने)
2) नंतर mutual fund किंवा ETF ( exchange traded fund ) पासून ट्रेडिंग ला सुरुवात करणं गरजेचं आहे ..( 4-5 महिने )
3) (यानंतर swing ट्रेडिंग shares मध्ये करून पाहन आणि profittable राहणं महत्वाचं आहे )
(5-6 महिने ).
4) हा टप्प्यानंतर share trading , सुरुवातीला अगदी लहान लहान लॉट घेऊन , म्हणजे 1000 रुपयांपासून सुरुवात करून 100000 रूपामध्ये करून सलग 5-6 महिने profitable राहणं गरजेचं आहे..(10-12 महिने)
5) आणि हा 2 वर्षांचा टप्पा पार करून option selling मध्ये किंवा buying मध्ये येन तरुणांकडून अपेक्षित असत .
                     पण , मी हा 2 वर्षाचा टप्पा पार न करता सरळ 5व्या टप्यात मध्ये ऑपशन ट्रेडिंग मध्ये आलो आहे याची कल्पना मला 1 वर्षानंतर आली..😢

                      5 महिने जॉब केल्यानंतर आणि हातात 40000 आल्यानंतर मी परत ऑपशन  ट्रेडिंग करायला सुरुवात केली , आणि ठरवलं 200 रुपयाचा stoploss , किंवा 200 रुपयांचा profit ह्यापैकी एक भेटलं तर ट्रेड मधून बाहेर निघायचं ! अस मी ghanshaym trade ज्याला आपण (art of trading) ह्या चॅनेल वरून मी psycology बद्दल शिकलो...आणि हळूहळू मला कळायला लागलं की ट्रेडिंग ही
 (50% psycology 50% disipline ) ह्यावर अवलंबून आहे..हे कळल्यानंतर मी त्यावर 3-4 महिने काम केलं ...आणि मी सलग 2 महिने profitable झालो सुद्धा  ,पण परत तोच psycology चा प्रॉब्लेम झाला मला वाटलं आता मी ट्रेडर झालोच पण मला हे माहीतच न्हवत की ,
8) कारण मार्केट 20 दिवस चालू असते , 15 दिवस जरी लॉस झाला तरी , जर आपण 1: 10 , 1:12  असे


1) ट्रेडिंग मध्ये सलग 1 -2 वर्ष profitable झाल्याशिवाय ट्रेडर झालो अस म्हणता ,येनार नाही 
आणि तो overconfidance मुळे 2 महिन्यात मिळवलेले 10 हजार एक महिन्यात 7 हजारच लॉस होऊन माझा चांगला झटका बसला ..
2) अति ट्रेडिंग करणे मला नंतर महागात पडलं कारण , hope trading  ,fomo , overconfidence मला महागात पडला .
3) पण ,एक गोष्ट मी या पहिल्या 1 वर्षा मध्ये शिकलो होतो ती म्हणजे ,लहान लॉट घेणे ,स्टॉप लॉस , आणि जास्ती ट्रेडिंग न करणे , स्थिर मार्केट मध्ये ट्रेड न घेणे, youtube , telegram न बघता स्वतःचा सेटअप आल्यानंतर च ट्रेड घेणे , ट्रेड घेतल्यानंतर थांबणे...
४) पण , मार्केट येथे संपत नाही, सलग 3-4 दिवस लॉस घेतल्यानंतर आपली मानसिकता , फक्त पैसे मिळवणे यावरच केंद्रित झाली ..
5) मी टार्गेट कडे लक्ष द्यायला बंद करून फक्त पैसा मिळवणे ह्यावर लक्ष दिले..
6) trailing stop loss ही गोष्ट मला शिकता आली नाही..
7) 1:2 1:3 जास्तीत जास्त 1:4  ह्यावरच समाधानी होतो पण ट्रेडिंग मध्ये 1:10 , 1:15 अशे टार्गेट मिळवणे हीच खरी गुरुकिल्ली आहे.. टार्गेट 2 दिवस घेऊ शकलो तरच , आपण trading मध्ये लांबच्या टप्यात टिकाव धरू शकतो..हीच खरी ट्रेडिंग ची गुरुकिल्ली..
9) मोठे टार्गेट मिळवणे हेच trading चे खरे आव्हान आहे , आणि त्यात मी निभाव धरू शकलो नाही..
10) आणि जवळ जवळ सगळे मिळून 25000 रुपये गेले , आज मला याचे वाईट वाटत नाही ,कारण मी ह्यातून खूप शिकलो , आणि नंतर मी etf ट्रेडिंग मधून कमावले .सुद्धा .

                    पण माझा खरा मुद्दा आहे , की यातून बाहेर कस  निघायच कारण  ''सट्टा '' आणि 'ट्रेडिंग ' हे एकच आहे , कारण ही एक नशा आहे , तुम्हांला बाहेर निघण्यासाठी खूप धैर्याने प्रयत्न करावे लागतात ,शेवटी मी तो निर्णय दीड वर्षानंतर घेतला , option ट्रेडिंग बंद..
                    सुरुवातीला वाईट वाटलं , जीव कासावीस झाला पण , मी हार मानली नाही आणि ह्या मायाजाल मधून मी बाहेर आलो ..


पण माझे काही प्रश्न आहेत जे मला कायम भिती वाटते 
1) जर माझ्याकडे खूप पैसे असते तर ?
2) 250000 च्या जागेवर 2500000 असते तर ?
3) मी बाहेर निघालो असतो का की गाळाप्रमाणे फसत गेलो असतो.
4) मला dipression आले असते का ?
5) याचा घरी परिणाम झाला असता का ?
6) अनेक लोकांनी फाशी घेण्याचा निर्णय घेतला तसा मी घेतला असता का ?

                      शेवटी माझा सल्ला हाच असेल की option trading हे middle class लोकांसाठी मुळीच नाही , 
ह्याची अनेक उदाहरण राकेश झुणझुणवाला , अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः सांगितलं आहे की '' option trading is not made for middle class people '' तुम्ही त्यांच्या वर टीका करा शिव्या द्या , पण देशाचा अर्थमंत्री अस का बोलला असेल याची जाणीव ठेवा ..
Zerodha चे मालक निखिल कामात यांनी सांगितले आहे की , option trading मध्ये 98 % लोकांचा पैसे बुडालेले आहेत..
 

काही लोकांना हे पटणार नाही , ते मला येड्यात काढतील पण शब्द आहे माझा वेळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्की शिकवेल👍


Thank you for reading my blog 





                

                      
 

Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...