Skip to main content

गावातून शहरात नोकरी निमित्त गेलेल्या मुलांची अवस्था ? आणि शेतकरी नवरा नको ग बाई !

शेतकरी नवरा नको गं बाई ! म्हणणाऱ्या मुली आणि त्यांचे आई वडील आज मोठ्या तोऱ्याने  सांगतात " आम्हाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको...
पण , त्याच्या आधी खरी परिस्थिती जाणून तर घ्या !

       मुलीच्या आई बापाला नोकरी म्हणजे पैसा , सुख , समाधान ,ऐश्वर्य , हे वाटत असत , खरी परिस्थिती नोकरी करणाऱ्या पोरांनाच माहिती असते , .मुळात पुणे -मुंबई सारख्या ठिकाणि नोकऱ्या करणाऱ्या पोरांचं आयुष्य हे मेंढरा च्या सारख आहे..सकाळी 8 वाजता घरून निघा , कारण ट्रॅफिक 9.30 ते 7 पर्यंत काम करा आणि रात्री 8 वाजता घरी या , 2 तास बसा ,झोपा , आणि परत तेच .
                    ना कोणते सण साजरे करता येतात , ना कोणते समारंभ ,आई -वडील , चुलते , पाहुणे , भाऊ यांच्या पासून लांब , जे काही असेल तर रविवारी , पुण्यासारख्या ठिकाणी जो मुलगा 30-40000 कमावतो त्याच्या हातात महिन्याच्या अखेरीस 5000 पण शिल्लक राहत नाही..10000 भाडं + 5000 किराणा + 5000 येजा + 5000 light bill , tv bill ,mobile bill ,फिरणे , हॉटेल , + त्याच अचानक emergency आली तर ,विषय संपला .. जेव्हा पगार 60000 -70000 होईल तेव्हा नोकरदारांची आयुष्यभराची कमाई 2bhk flat , 10 लाखाची गाडी ,मुलांची शिक्षण ,ह्यायच संपून जाते.."

EMI वरच सगळी जिंदगी " असा माझा एक मित्र कायम आम्हाला चिडवत असतो.

       

         शेतकरी मुलगा ,छान घर , एकुलता एक असेन तर , 4-5 एकर बागायती जमीन ,किंवा जिरायती असेल तर ,धंदा असावा तो मुलगा शहरातल्या 50000 वाल्या नोकर दारांना कधीही भारी..कारण आई-वडील सांभाळून , सण - समारंभ कुटुंबासोबत साजरे करता येतात , कमी प्रदूषण , शुद्ध पाणी, मित्र-नातेवाईकांचा सहवास , 

                   माझ्या मामाने सांगितलं होतं तू नोकरी निवडली तर , तू 10 वर्ष आयुष्य कमी जगणार , कारण तुला जेवण शुद्ध मिळणार नाही , दूध सुद्धा तू भेसळयुक्त पिणार ,पाणी सुद्धा कॉर्पोरेशन च chemical टाकलेलं पिणार , कॉम्प्युटर मुळे डोळे आणि कंबर जाणार ,तू जेव्हा retire होशील तेव्हा तुज्या जवळ पैसे असेलही ,पण शरीर निरोगी नसेल आणि जिवाभावाची मित्र आणि नातेवाईक तू कमवू शकणार नाही

                      आज शहरातल्या मुलांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्राचा  , कारण कॉर्पोरेट मध्ये दर 2-3 वर्षाला जॉब बदलावा लागतो , दर 2 वर्षांनी नवीन मित्रांमुळे जीवाला जीव देणारे मित्र बनवता येत नाही , काही मनातलं असेल तर मन मोकळं करता येत नाही , या सगळ्यामूळ anxiety आणि depression मोठ्या प्रमाणात शहरात वाढलेले दिसत आहे...

                       '' काटकपणा '' नावाची गोष्ट आज ना तरुणांमध्ये राहिली आहे ना त्यांच्या लहान मुलांमध्ये , obesity आणि चष्मा लागणे हे आजार आज मुले -आणि मुली यांच्या मध्ये सहज दिसतात ..
                         नोकऱ्या करणाऱ्या लोकांच्या मुलांना भावकी, नातेवाईक, सण , वार , या गोष्टीचा विसर पडलेला असतो , "individualism " हाच त्यांचा दागिना असतो, " पाहुणचार " म्हणजे काय? आशा संकल्पना त्यांच्या dictionary मध्ये नसतात ...थोडक्यात

 'bad time crate strong people'
Good time crate weak people '

या म्हणी प्रमाणे ,दुर्बल पिढी शहरात घडवली जात आहे ..ह्या पिढीचा , संस्कृती , परंपरा , धर्म, देव , भावकी , नातेवाईक ,शेती , कुलदैवत ,आजी -आजोबा  या सगळ्या गोष्टींपासून फारकत घेऊन फक्त मी आणि माझे 'पपा मम्मी , तेच काय ते त्यांचं जग बनलेलं असत..
                  आज मी सुद्धा पुण्यात शिक्षण घेतोय  , आज ना उद्या नोकरी भेटेल , पण कायम स्वरूपी शहरात राहुन अस आपण नक्की काय मिळवणार आहोत , जे आपल्याला गावात भेटत न्हवत ? हा प्रश्न कायम माझ्या मनात घर करून राहतो ...
                      माझ्या पुढच्या पिढीसाठी गावाला आणि शहराला मी रोज वेगळ्या वेगळ्या मापाने तोलत असतो...

आतापर्यंत तरी गावाच पारड आई -वडील , शेती , नातेवाईक , चुलते , सण , समारंभ , देव , हवा, जेवण, मानसिक आधार , समाधाना, मुळे एकबाजूला झुकलेले आहे...


शेवटी गड्या आपलं गावच बर !

Comments

Popular posts from this blog

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत ! चला मग एक एक करून पाहू .. त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? ३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ? ४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ? १) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ? :- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही. उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व . क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत . २)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ? जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...