2025 उजाडला आहे , महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार स्थापन झालेले आहे ...जानेवारी च्या सुरुवातीला बीड च्या सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड , धाराशिव ,जालना , परभणी, संभाजी नगर ,सह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निषेध मोर्चे निघाले , सर्व पक्षातील पदाधिकारी या निषेध मोर्चा मध्ये होते , सुरेश धस (भाजप) संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) प्रकाश सोळंके (अजित पवार गट) अंबादास दानवे (उद्धव ठाकरे ) या सर्व नेत्यांनी या हत्येचा निषेध केला ,
पण या प्रकरणात " जारांगे पाटील " हा माणूस बाहेर काढला तर , हे सर्व नेते मिळून आंदोलन उभं करता आलं असत का , हा मोठा प्रश्न आहे ?
कारण जारांगे पाटील हे महाराष्ट्राच्या समाजकारणात आणी राजकारणात गेल्या दीड वर्षात अविभाज्य भाग झालेले आहेत ..मराठा समाजाला "मराठावादी " भूमिकेचं महत्व त्यांनी पटवून दिले , जर आज मराठा , एक समाज म्हणून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माघे उभा राहिला तो फक्त जारांगे पाटलांच्या मुळेच !
आज बीड मध्ये ज्या मुंढे घराण्याच्या या संघटित गुन्हेगारी ला चोख प्रत्युत्तर भेटलं आहे हे फक्त जारांगे यांच्या मुळेच..
गावठी भाषा , कितिही मोठ्या नेत्याला सरळ अंगावर घेण्याची क्षमता , आणि जशास तस प्रत्युत्तर देण्याची प्रवृत्ती , आज मराठा समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द , यामुके मनोज जारांगे पाटील यांनी आज प्रस्तापित मराठा राजघराणे आणि मराठा नेते यांना शह दिला आहे...
यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणाच्या काळात भाजप आमदारांना पाचारण केलेले आहे , 1) मुंदडा 2) धस 3) अभिमन्यू पवार 4) नरेंद्र पाटील यासारखे भाजप आमदार आज संतोष देशमुख यांच्या निषेध मोर्चा मध्ये भाषण करताना दिसतात..
मराठा समाजाने यावरूनच जारांगे पाटलांची किंमत आज महाराष्ट्रामध्ये कीती आहे हे ओळखावे !
जारांगे पाटील भाजप शी संगनमत करत नाही ,अस दिसल्यानंतर भाजप आमदार जारांगे पाटलांच्या मोर्चात पाठवून फडणवीस यांनी एक तिर में जारांगे , पंकजा, आणि धनंजय मुंडे यांना शह दिला आहे..
मराठा समाज परत एकदा 25 जानेवारीला OBC आरक्षना साठी साखळी उपोषण करणार आहे...त्यामुळे जारांगे पाटलांच्या भूमिकेच्या ठामपणे पाठीमाघे राहणं गरजेचं आहे...कारण सत्ताधारी परत एकदा बीड मध्ये ज्या प्रमाणे भाजप प्रणित आमदार घुसवण्यात आले त्याच प्रमाणे आरक्षणामध्ये ही घुसवण्याची शक्यता आहे ! कारण काळ वाईट आहे !
मराठा समाजाला ही जाणीव असणं गरजेचं आहे की , आपण जारांगे पाटील नावाच्या आशा माणसाला पाठिंबा देत ,आहोत की ज्याने गेली 15 वर्ष मराठा समाजासाठी 10 वेळा आमरण उपोषण , 20-25 वेळा मोर्चे , आणि प्रसंगी समाजासाठी सलग 17 दिवस आमरण उपोषण ....
मुंबई ची वारी कोण विसरेल ! सरंजामी मराठा नेेेते काँग्रेस (देशमुख -लातूर , पाटील - कोल्हापूर , थोरात -संगमनेर ) , शरद पवार गट (पवार घराणे , पाटील - इस्लामपूर , मोहिते पाटील - अकलूज ) भाजप (भोसले घराणे- सातारा , पाटील - शिर्डी , तावडे , शेलार , अशोकराव , दानवे ) शिवसेना -( एकनाथराव , भुमरे , भुसे ) उद्धव सेना ( दानवे अंबादास , ) अजित पवार गट , यामधील एकही मराठा नेेता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या भूमिकेेेचा नाही )
त्यामुळे मराठा समाजाची आणि त्यातही खासकरून तरुणांची जबाबदारी आहे की , ह्या पुढील काळात मार्केटिंग च काम तुम्हाला करावं लागणार आहे.watsapp status , facebook status ,post आणि जमलं तर विडिओ आणि ब्लॉग पोस्ट , लिहाव्या लागणार आहेत...कारण आता ही लढाई गरजवंत मराठा विरुद्ध सरंजामी मराठा अशी झालेली आहे...)
(http://learnmarketing9201.blogspot.com/2025/01/blog-post_15.html )
शेवटी 25 जानेवारी च्या आंदोलनात सहभागी होऊन पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल
Comments
Post a Comment