मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?
काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल !
मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ?
हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली..
कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे .ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला .
तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या !
त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव्हत . १२ science हीच आपली ओळख . सांगायचं राहिलंच vacancy ही sales person आणि शिफ्ट manager साठी होती..
Interview साठी १० min wait केला ..आणि बॉस आलेले होते . मला interveiw ला कसे जातात याची सुद्धा कल्पना नव्हती . मी एक slipper आणि t-shirt घालून गेलो होतो आणि हातात झेरॉक्स च पान .
मोजून १० min interview झाला असेल .सर बोलले ३ महिने सुट्टी भेटणार नाही , मी bollo' हो chalel' शेवटचा प्रश्न विचारला कधी join होतो, मी बोललो उद्या आणि interview संपला .
दुसऱ्या दिवशी जॉईन झालो , सकाळी एकदम ९च्या ठोक्याला गेलो ..
पहिला ३ महिने मी १५ मिनिट सुद्धा उशीर केला नाही आणि १ सुट्टी सुद्धा घेतली नाही .
आणि
ही माझी जॉब वरची दुसरी शिकवण होती ,की जॉब वर सुरुवातीचे दिवस संघर्षात काढले की ,पुढचे दिवस आरामात जातात !
सुरुवातीला गोरे सरांनी मला खूपच strict trainning दिली , काही वेळा ती मला अवास्तव आणि अवाजवी वाटायची ,पण त्याच training ने मला जॉब मध्ये skill आणि patience शिकवला ..
(ही ठरली माझी 3री शिकवण )
सीनिअर कडून सुरुवातीच्या काळात होईल तितकं , जॉब बद्दल काढून घ्या ! थोडक्यात त्यांचा विश्वास संपादन करा..ते मला खूप वेळा ओरडले सुद्धा '' पण मी कधीच एक शब्द उलट बोललो नाही ..माझं उत्तर असायचं '' हो सर ठीक आहे': पुढे जाऊन मला या गोष्टींचा खूप फायदा झाला ..
जॉब मध्ये 'हो सर ' आणि ' yes sir ' ,
''ठीक आहे karto'' सीनिअर आणि manager लोकांना कधीच explanation देण्याचा प्रयत्न करू नका ! त्यांना ते आवडत नाही .
(ही माझी ४ थी शिकवण होती...)
Natural ice-cream सारख्या मोठ्या ब्रँड मध्ये काम करत असताना ..grooming ला खूप महत्त्व आहे .
प्रेस केलेले कपडे घालणं , १-२ दिवसांनीं दाढी करण , केस जास्त वाढू न देणं , ब्लॅक बेल्ट आणि shoes त्यांना पॉलिश करण महत्वाचं आहे , नख कापण , कायम हातात hand gloves वापरणं , डोक्यामध्ये कायम टोपी किंवा हेअर net घालणं ( service sector आणि फूड सेक्टर मध्ये हे खूप महत्त्वाचे आहे )
(५वी शिकवण..)
Naturals ice-cream मध्ये कप ची सुरुवात ८० रुपये आणि shake chi किंमत १७० रुपये ..त्यामुळे higher middle class आणि higher class चे कस्टमर कायमच जास्त असत..
त्यामुळे guest आल्यानंतर , good morning ,afternoon , evening खूप महत्त्वाचं आहे , त्यानंतर आइस्क्रीम taste साठी सुद्धा आग्रहाने देणे खूप महत्त्वाचे असते , आणि शेवटी विनम्र पणे thank you sir / mam have a nice day असं बोलणं हे त्या guest ला बोलणं हे सुद्धा खूप महत्वाचे आहे .( ६वी शिकवण )
Service आणि फूड सेक्टर मध्ये customer सोबत आदर आणि विनम्रपना खूप महत्वाचा असतो..guest ना काही अडचण आली तर , कधीही आवाज चडउन बोलता कामा नये ..जर आपलं बोलणं विनम्र असेल तर १० पैकी ८ guest आपण आरामात handle करू शकतो ..पण त्या २ customer साठी आपल्याला company च्या rules आणि regulations बद्दल सरळ शब्दात सांगायचे सामर्थ्य सुद्धा दाखवाव लागत ...
(७वी शिकवण.....)
(८ वी शिकवण ) नी ने मला जॉब मध्ये सगळ्यात लहान असून सुद्धा कधी कामाचं ओझ आणि ताण झाला नाही ,
स्वताला दिलेलं काम स्वतः करायचं , दुसऱ्याला मदत करण्याच्या भानगडीत पडत बसायचं नाही...
प्रसंगी कुणी मदत मागितली तर , करायची सुद्धा पण , अतिरेक करायचा नाही ..
Company मध्ये informal ग्रुप + राजकारणी ग्रुप तयार झालेली असतात , त्यामध्ये शक्यतो सीनिअर च्या ग्रुप मध्ये जायचा प्रयत्न करा.... कारण जॉब मध्ये आपण किती दिवस राहणार आहोत हे ,हा राजकारणी ग्रुप ठरवतो ,कुणाला खर वाटेल किंवा खोटं पण हेच सत्य आहे ..
बॉस सोबत कायम आदराने बोला , कधी गरज लागेल सांगता येत नाही , कारण माझ्यासोबत असा प्रसंग आला होता ..माझे पेपर सुरू होते आणि रात्री नऊ वाजता बॉस चा फोन आला आणि मला ७ दिवस कामाला बोलावलं , मी बोललो सर पेपर आहेत नी जमणार , खूप request केल्यानंतर मी हो बोललो , ७ नाहीतर , १२ दिवस कामाला गेलो , शेवटी काम सोडताना आणि बोनस च्या वेळेस बॉस ने जास्तीचे पैसे आणि तू परत कधी पण ये तुला हा जॉब मोकळा आहे , तुला पुण्यात जॉब लाऊन देऊ का ? अस बॉस च शेवटचं वाक्य होत ..मी म्हणालो सर मी mba करतोय पुण्यात मला mba करत जॉब करता येणार नाही !''
Learnmarketing9201.blogspot .com
Comments
Post a Comment