डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व आणि लोकल व्यवसायांसाठी त्याचा उपयोग
आजच्या 21व्या शतकात आपण पाहतो की दर 5-6 वर्षांनी नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानामुळे नवीन नोकऱ्या आणि व्यवसाय निर्माण होत असतानाच काही पारंपरिक व्यवसाय नामशेष होताना दिसतात. जसे की, 5-6 वर्षांपूर्वी आलेले Jio, त्यानंतर PhonePe, Google Pay आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डिजिटल मार्केटिंगने व्यवसाय जगतात दूरगामी बदल घडवले आहेत.
यामुळे प्रश्न निर्माण होतो की, 2025 मध्ये गावांतील तसेच शहरांतील लहान दुकानदारांना डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व समजले आहे का?
- डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?digital marketing infographics
डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपला व्यवसाय ऑनलाइन माध्यमांतून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. यात खालील पद्धतींचा समावेश होतो –
-
कंटेंट मार्केटिंग – व्हिडिओ, फोटो, ब्लॉगद्वारे व्यवसायाचा प्रचार
-
ई-मेल मार्केटिंग – ग्राहकांशी थेट संपर्क साधून नवीन उत्पादने किंवा ऑफरची माहिती देणे
-
सोशल मीडिया मार्केटिंग – इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे ब्रँड प्रमोशन
-
Quora मार्केटिंग – प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ब्रँडची विश्वासार्हता निर्माण करणे
-
Google आणि Facebook Ads – पेड जाहिरातींद्वारे व्यवसायाचा प्रचार
-
इन्फ्लुएन्सर मार्केटिंग – प्रसिद्ध व्यक्तींमार्फत उत्पादनांची जाहिरात करणे
-
SEO (Search Engine Optimization) – व्यवसाय किंवा उत्पादन Google सारख्या सर्च इंजिनमध्ये टॉप रँकिंगमध्ये आणणे
- लोकल व्यवसायांसाठी डिजिटल मार्केटिंगचा उपयोग कसा करावा?
उदाहरणार्थ, एक शेतकरी जो भाजीपाला विकतो, त्याला डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून व्यवसाय वाढवायचा असेल, तर त्याने खालील गोष्टी केल्या पाहिजेत –
सोशल मीडिया ग्रुप तयार करणे – फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर व्यवसायाचे ग्रुप आणि पेज तयार करावे.
ब्रँड ओळख निर्माण करणे – चांगले DP (Profile Picture) ठेवावे, व्यवसायाचे आकर्षक नाव आणि टॅगलाईन निवडावी.
कंटेंट शेअर करणे – भाजीपाला, दूध, दही, तूप यांसारख्या उत्पादनांचे फोटो, व्हिडिओ आणि ब्लॉग Canva सारख्या अॅप्सच्या मदतीने तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करावे.
ई-मेल मार्केटिंग – नियमित ग्राहकांना ई-मेलद्वारे नवीन उत्पादनांची माहिती द्यावी.
SEO चा वापर करणे – योग्य Keyword Research करून Google सर्चमध्ये आपला व्यवसाय टॉपवर आणण्याचा प्रयत्न करावा.
Google Analytics चा वापर – जाहिराती आणि पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचत आहेत, याचे विश्लेषण करून सुधारणा करावी.
- डिजिटल मार्केटिंगचे फायदे
डिजिटल मार्केटिंगचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत –
-
मार्केटिंगसाठी खर्च कमी येतो – पारंपरिक जाहिरातींच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग स्वस्त असते.
-
मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते – सोशल मीडियामुळे कमी वेळात आणि कमी खर्चात मोठ्या संख्येने लोकांपर्यंत व्यवसाय पोहोचवता येतो.
-
मार्केटिंगचे निकाल मोजता येतात – Google Analytics आणि इतर साधनांद्वारे जाहिरातींचे परिणाम तपासून व्यवसाय सुधारता येतो.
संदर्भ -
1)blog
Comments
Post a Comment