भारत स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाले , ह्या वर्षात भारतातील sc ,st , obc ,स्त्रिया , यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिल
" हिंदू कोड '' साठी प्रचंड विरोध असताना त्यासाठी बाबासाहेबांनी हट्ट धरला , प्रसंगी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला , sc , st , obc साठी 2000 वर्ष पूर्वीची अन्यायी व्यवस्थेला सुरुंग लावून आरक्षण विविध योजना , आणि कलमांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला ..
तरीसुद्धा sc , st , obc , स्त्रिया कोणीच बाबासाहेबांना का मानत नाही ? शिवाय आंबेडकरी समाज !
कृपया हा फॉर्म भरा
हा मोठा गहन प्रश्न आज भारताच्या आंबेडकरी चळवळीतील लोंकांच्या पुढे आहे !
याची मुख्य कारणे :
१) डाव्या चळवळीतीळ प्रस्थापित नेते !
२) आंबेडकरी नेते !
३) शाळा कॉलेज !
4) आत्यंतिक डावे नेते !
5) सर्वमान्य नेतृत्व .
6) काँग्रेस
7) आंबेडकरी चळवळीतील शिकलेला वर्ग !
8) सामाजिक भीती
1) डाव्या चळवळीतील प्रस्थापित नेते:

डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी आर्थिक विषमतेवर भर दिला, परंतु जातीय विषमतेला फारसा प्राधान्य दिले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही.शरद पवार ,काँग्रेसने आंबडकरी विचारांचे नेते मोठे होऊन दिले नाहीत ( जितेंद्र आव्हाड अपवाद )
2) आंबेडकरी नेते:
आंबेडकरी समाजाचे अनेक नेते आपापल्या राजकीय फायद्यासाठी बाबासाहेबांचे नाव वापरत राहिले, पण त्यांच्या विचारांना आणि उद्दिष्टांना न्याय देण्याचे प्रयत्न फार कमी झाले. अनेकजण आपल्या छोट्या गटांमध्ये विभागले गेले, त्यामुळे व्यापक एकता निर्माण होऊ शकली नाही, माननीय कांशीराम साहेबांनि जे सर्वसमावेशक धोरण उत्तरप्रदेश मध्ये राबून 15 वर्ष सत्ता आणली ,तशी सर्वसमावेशकता आंबेडकर , आठवले ,कवाडे , यांच्या टोकाच्या विरोधामुळे आणता आली नाही ..
3) शाळा-कॉलेज:
शिक्षण संस्थांमध्ये आंबेडकर विचारांचा समावेश पुरेशा प्रमाणात झालेला नाही. अनेकदा इतिहासात बाबासाहेबांचे योगदान केवळ संविधान निर्मितीपुरते मर्यादित करून शिकवले जाते. त्यांचे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा विषयक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.याला जबाबदार शिक्षण व्ययस्थेतील वरच्या बाजूस बसणारे लोक आहेत , आज पण आपण पाहतो विद्यापीठाचे कुलगुरू , प्राचार्य हे विशिष्ठ समाजाचे घेतले जातात , खाजगी शिक्षण संस्था , अभ्यासक्रम बनवणारी मंडळी बहुतांश आज पण ब्राह्मण समाजातील किंवा उजव्या परिवारातील आहेत ..विवेक ,चिकित्सा , यांचा अभाव आपल्याला सहज दिसून येतो..
4) आत्यंतिक डावे नेते:
या गटाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपेक्षा मार्क्सवादाला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे वर्गसंघर्ष आणि जातिसंघर्ष यातील फरक समजून घेतला गेला नाही.आणखी एक म्हणजे कायम देवांना शिव्या घालणारे नेते , यांनी भाषा वापरताना (खालची ) भाषा वापरली त्यामुळे चळवळीची आपुलकी वाटण्याच्या जागी लोकांच्या मनात भीती वाटू लागली..
5) सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव:
बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करणारे एकत्रित आणि प्रभावी नेतृत्व तयार होऊ शकले नाही. त्यामुळे समाज वेगवेगळ्या दिशांना विभागला गेला.आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीतील सर्वसमावेशक नेता कोणता तर उत्तर भेटत नाही , प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या मुळे आज नवबौद्ध च त्यांना मतदान करत नाही..शेती , पाणी , रोजगार ,मजूर ,ह्या महत्वाच्या प्रश्नाकडे पाठ करून फक्त सामाजिक चळवळ रेटल्यामुळे आंबेडकरी चळवळीचे आज डबके झाले आहे..
6) काँग्रेस:
काँग्रेस पक्षाने दीर्घकाळ आपली राजकीय पकड कायम ठेवण्यासाठी दलित समाजाला फक्त मतबँक म्हणून पाहिले. बाबासाहेबांचे विचार रुजण्याऐवजी त्यांना मर्यादित स्वरूपात स्वीकारले गेले.
7) आंबेडकरी चळवळीतील शिकलेला वर्ग
आज sc ,st , obc समाज शिकला आहे ,मी स्वतः पाहिलेले आहे की शिक्षक , इंजिनियर , डॉक्टर , सरकारी नोकरदार ,या लोकांना "आंबेडकरवाद " कळायला लागला आहे पण आंबेडकर वाद आपण संगायला लागलो तर समाज स्वीकारेल का ह्या भीतीने ते अस्वस्थ आहेत ..सर्व योजनांचा लाभ घेऊन काहींनी स्वतःची प्रगती साधली, पण समाजातील इतरांना मदत करण्याची जबाबदारी फारच कमी लोकांनी घेतली.
8) सामाजिक भीती:
जातिव्यवस्थेच्या विरोधात उभे राहिल्यास सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे अनेक लोक बाबासाहेबांच्या विचारांवर उघड भूमिका घेत नाहीत.
Rss असेल , किंवा भाजप यांना या भारतात फक्त आंबेडकरवाद पुरून उरु शकतो ,पण आज दुर्दैवाने बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्य ज्या विचारधारेच्या विरोधात एकट्याने उभं राहून जे वैभव sc , st, obc साठी उभं केलं होतं त्यावर आज तेच sc st obc आंबेडकर वादावर कुऱ्हाड चालवण्याचे काम करत आहेत ..
Comments
Post a Comment