आपण या ब्लॉग मध्ये 5 प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत जेणेकरून शेतकरी मित्रांना आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा कर्ज घेण्यासाठी नक्की होईल ..



1) Cibil स्कोर म्हणजे नक्की काय ?
2) सिबील स्कोर चा इतिहास ?
3) शेतकरी आणि सिबील स्कोर ?
4) सिबील स्कोर च मोजमाप ?
5) चांगला सिबील येण्यासाठी काय करावं ...
1) सिबील स्कोर म्हणजे काय ?
Cibil स्कोर चा अर्थ आहे (credit information bureau india limited ) - कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचा कर्ज परताव्याचा इतिहास , कर्जाचे हफ्ते फेडण्याचा इतिहास , कोण कोणते कर्ज घेतले , या सगळ्यांची माहिती बँक व NBFC म्हणजे गोल्ड loan , होम fianance च्या कंपन्या , बजाज आणि muthoot finance आपल्याला माहीत आहेच की...यांना म्हणतात NBFC म्हणजे नॉन बँकिंग fianancial कंपनी ..यांना ही संस्था देते ...
2) इतिहास :-
मुळात ही संस्था 2000 साली स्थापन , झाली पण 2007 पासून काम सुरू झालं ...
कर्ज घेणाऱ्या ग्राहक किंवा company यांचा कर्जाची परतफेड कशाप्रकारे करतात , यावर नियंत्रण व सुसूत्रता आणण्यासाठी cibil स्कोर चा वापर केला जातो..
३) शेतकरी आणि सिबील स्कोर :-
मुळात शेतकरी आणि सिबील आधी संबंध येत न्हवता कारण , 7/12 उतारे पाहून कर्ज (पीक , टॅक्टर ) दिले जायचे ..पण सिबील स्कोर 2017-18 पासून बँका मध्ये , शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या अगोदर सिबील report पाहणे सुरू झाले..त्यामुळे कर्ज उशीरा भरणारे किंवा बुडवणार्या शेतकऱ्यांची पंचायत झाली ..व शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी ओळख आणि त्याचबरोबर साहेबांना पैसे देऊन कर्ज मंजूर केलेली आहेत..
पण महत्वाचं म्हणजे गरीब शेतकरी (4 एकर क्षेत्र) असणारे यांना कर्ज भेटणे अशक्य झाले ..कारण म्हणजे Cibil score कमी थकीत पीककर्ज आणि ओळख नसणे ..
4) सिबील स्कोर चे मोजमाप ?
पण 700 - 800 हा सर्वोत्तम cibil score आहे ..
500 म्हणजे खराब कर्ज मिळत नाही..
5) cibil स्कोर कमी का होतो ?
याच मुख्य कारण आहे वेळेवर कर्जाचे हफ्ते न भरणे ..
आणि शेतकऱ्यांमध्ये ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते की शेतकरी हफ्ते भरण्यासाठी कानाडोळा करतो ..
महत्त्वाचे - समजा तुम्ही amazon वरून 500 रुपयांच जरी कर्ज घेतले 1 महिन्यासाठी (prepaid रेचार्जे ) आणि तुम्हाला वाटलं कोण 500 रुपयांनी काय होतंय ? म्हणून 10 महिने तो हफ्ता भरला नाही तर तुमचा cibil स्कोर 700 वरून 450 -500 दरम्यान 100% घसरणार ..कारण 90 दिवसापेक्षां जास्त उशिर म्हणजे (cibil Report मध्ये wriitten off किंवा setteld असे वाईट शब्द दिसतात )
परिणाम -1) बँकेत जेव्हा कर्ज काढायला जाता तेव्हा 500 क्रेडिट स्कोर मुळे कर्ज भेटत नाही .
2) लगेच जरी हफ्ते भरले (म्हणजे 500 credit scoreआल्यानंतर दुसऱ्या दिवशी ) तरी 1 वर्ष 700 होण्यासाठी लागतो )
3) बँका कर्ज देणारे (फायनान्स )वाले फक्त एकच गोष्ट बघतात ती म्हणजे हा माणूस वेळेवर कर्ज भरतो की नाही ? बाकी ते कर्ज 500 असो किंवा 5000000 काही घेणं देणं नाही ..
4) चांगला सिबील ठेवण्यासाठी काय करावं ?
1. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर हफ्ते भरा .
2) शेतकऱ्यांनि लहान कर्ज वर्षातून किमान 2 घ्यावे म्हनजे मुलांसाठी लॅपटॉप , मोबाइल , कुटी मशीन , tv , फ्रिज , मोटर , ठिबक , यासारखे लहान मोठे कर्ज फायनान्स नेच घ्यावे कारण ही लहान कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला मोठी कर्ज दिले जातील...(छोटे शेतकरी लक्षात असुद्या )
3) टॅक्टर , घर , जमीन तारण , सौरपपं , यासारखे मोठे कर्ज घेताना 1-2% फायदा होइल व्याज दर कमी होतो..जर 750 + cibil , 10 वर्ष जुन बँक अकाउंट , 10 -12 वर्ष हफ्ते न चुकवण्याचा इतिहास असेल तर फायदा ...
4) cibil स्कोर चेक करत चला 3-4 महिन्याला
5) चेक करण्यासाठी phone वर जावा नंतर loan >>>>>वर दाबा आणि credit स्कोर मध्ये जाऊन number >>email >>आणि pan card नंबर टाका
( धन्यवाद ! )
Comments
Post a Comment