Skip to main content

बीड च्या दहशतीचे धागेदोरे ?

आज आपण गेल्या १ महिन्यापासून बीड चा बिहार झाला ! बिहार झाला ! बोलत आहोत पण ह्या बीडच्या बिहार होण्यामाघे अनेक कारणे आहेत !
चला मग एक एक करून पाहू ..
त्याआधी आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत.

१) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ?

२)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ?

३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार का ?

४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ?

१) सुरेश धस आणि सोळंके , क्षीरसागर यांची या प्रकरणात उडी ?

:- सुरेश धस यांना पंकजा मुंडे and धनंजय मुंडंनी विधानसभेत महायुती मध्ये असून मदत केली नाही.
उलट धोंडे यांना मदत करून सुरेश धस यांना पाडण्याचा  प्रयत्न केला , हाच राग मनात ठेऊन धस यांनी मुंडे विरोधात मोर्चा वळवला . आता मुंडेना धस ही डोकेदुखी झाले आहे , आणि आणखी एक कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिनीच वाढत वर्चस्व .
क्षीरसागर हे मुंडेचे जुने पारंपरिक  विरोधक आहेत .
२)जरांगे पाटलांच संतोष देशमुख प्रकरणातील महत्त्व ?
जारांगे पाटलांची या प्रकरणातील उडी सगळ्यात महत्वाचा भाग आहे . कारण सुरेश धस , सोनवणे , आणि क्षीरसागर यांनीच फक्त आवाज उठवला असता तर , हे राजकीय प्रकरण आहे असं वाटलं असतं , पण जारंगे पाटील यांच्या मुळे मराठा समाजाची साथ आणि वंजारी समाजाच्या गुंडाची दहशतीला आवाज उठवण्यासाठी जरांगे पाटील यांची गरज मराठा समाजाला वाटू लागली .जरांगे पाटील यांनी या प्रकरणाला जातीय वळण देण्याचं काम केलं,आणि हे प्रकरण देश पातळीवर गाजलं . जरांगे पाटील यांचा या मोर्चा मध्ये असणारा सहभाग बीडच्या दहशती पासून आणि वाल्मीक कराड चा गुंडा च्या काळजात नक्कीच भीती निर्माण होईल अशी आशा मराठा समाजाला आहे .
३)संतोष देशमुख प्रकरणाला जातीय किनार  आहे का ?

मुळात संतोष देशमुख हे नमिता मुंदडा ज्या केज च्या विद्यमान आमदार आहेत ,त्यांचे ते कार्यकर्ते , देशमुख हे लोकसभेला पंकजा मुंडे यांचे बूथप्रमुख म्हणून काम केलं आहे . पण संतोष देशमुख अपहरण प्रकरणातील सर्व आरोपी हे वंजारी समाजाचे असल्याने ,मराठा समाजाला या प्रकरणाला जातीय किनार आहे हे वाटण साहजिक आहे . घुले , आंधळे, चाटे , कराड  .

४) फडणीवीसांचा एका बाणात ३ पक्षी कसे उडवले ?

पण संतोष देशमुख प्रकरणा मध्ये
  खरा विजय हा देवेंद्र फडणवीस यांनी एका बाणात ३ पक्षी जरांगे पाटील , धनंजय आणि पंकजा मुंडे  कारण ,जरांगे पाटील यांना बीडच्या मोर्चा मध्ये सत्ताधारी पक्षाच(भाजप) कौतुक करावं लागलं कारण १)धस २)मुंदडा ३)नरेंद्र पाटील ४) अभिमन्यू पवार यासारख्या भाजप आमदारांचा पाठिंबा या मोर्चाला असल्याने जरांगे
यांची चांगलीच पंचाईत झाली, आणि नंतर त्यांना अजित पवारांवर पण , बोलता आलं नाही कारण , १) सोळंके २) पंडित ३)विटेकर हे पण अजित पवारांचे आमदार मोर्चा मध्ये उपस्थित होते.
 धनंजय मुंडे यांचे वाढणारे राजकीय अस्तित्व आणि पंख देशमुख प्रकरणाच्या निमित्ताने फडणवीस यांनी छाटले .

बीड क
 बीड मध्ये बिहार होण्याला सुरुवात खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे यांनी केली !
आणि याला जातीय किनार सुद्धा आहे बरका . 
कारण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या सोयीनुसार बीड मध्ये वंजारी समाजाच्या अधिकारी , शिक्षक , जी बिंदूनामावली च्या विरुद्ध जाऊन भरती करण्याची सुरुवात केली .
याचे समकालीन पुरावे उपलब्ध आहेत..
हीच रेघ पुढे पंकजा मुंडे आणि नंतर धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री झाल्यानंतर ,वाल्मीक कराडांच्या मदतीने बीडला बिहार करून दाखवले .
बीड मध्ये कायम दुष्काळ , पाण्याची टंचाई , उद्योगधंद्यांची कमतरता, ऊसतोड मजुरांचा  जिल्हा म्हणून ओळख , शिक्षणाचा अभाव , आणि यातूनच होणारी दारिद्य्रता आणि वाढणारी गुंडगिरी .
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर बीडला सुध्रवण्याची संधी बीडकरांनी वारंवार मुंडे परिवाराला दिली, पण बीडच विकास सोडून ,स्वाजातीचा विकास आणि जातीच्या गुंडांना प्रोत्साहन देऊन ,इतर समाजावर मनगटाचा आणि आर्थिक कोंडी करणे हे मुंडे परिवाराने केले
 . 

* धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडांचे प्रताप ?

धनंजय मुंडे २०१९ साली पंकजा मुंडे चा पराभव करण्याच्या आधी ते विधानपरषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार होते आणि विरोधी पक्षनेते सुद्धा होते .
२०१९ नंतर धनंजय मुंडे यांनी परळी ची सूत्रे कराड यांच्या कडे दिली . यातून कराड यांनी अफाट संपत्ती , गुंडांच्या टोळ्या , आणि मानस सुद्धा कमवाली,
गोपीनाथ मुंडें यांच्या घरात घरघडी असणारा वाल्मीक आता पूर्ण बीडचा (अण्णा ) झाला , 
औद्योगिक विदुत प्रकल्प यातील राख असो
वा कुनला खंडणी वसूल करण असो ,किंवा निवडणुकीत दमदाटी , मारहाण करून जरब बसवणे असो, वाल्मीक कराड ने परळी च बिहार करून दाखवले ,
कंबरेला बंदूक ठेवून फिरणारा वाल्मीक कराड ने विरोधक आणि  गोरगरीब मानस ते राज्याचे  मंत्री या सर्वांच्या जवळचा झाला...


असो , आता फडणवीस यांच्यावर सगळ्या महाराष्ट्राची नझर आहे...
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

आंबेडकरी आणि मुस्लिम समाज सावधान ! आता फडणवीस आलेत !

2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..                     पहिली घटना ,  2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..                       दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथ...