महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..
मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...
महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज 90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाचे प्रमाण कमी। झाले आहे , या गोष्टी राजकीय पक्षांनी कधीच समजून न घेता वापर केला , या सर्व गोष्टी मूळ मराठा समाजाला वाटू लागले की आपला पण पक्ष असावा , मुळात या भावनेची सुरुवात 10 वर्षांपूर्वी झालेली होती..
१) दूध उत्पादक शेतकरी
2) पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी.
3)उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी. 4) ऊसतोड मजूर..
5) विद्यार्थी
6)मजूर
7)स्त्रिया
8) महागाई
9)मराठवादी भूमिका
10) पाणी प्रश्न
11) भ्रष्ट्राचार
यासर्व अडचणींचा उपाय महाराष्ट्रा कडे नव्हता , जारांगे पाटलांच्या निमित्ताने तो पर्याय महाराष्ट्राला भेटला असता !
:पक्षाची मोट बांधण्याची ही सुवर्ण संधी पाटलांकडे होती !
जारांगे पाटील (अध्यक्ष )
१) बचू कडू (कुणबी आणि शेतकरी नेते)
2) राजू शेट्टी (जैन आणि शेतकरी नेते)
3)महादेव जानकर (धनगर नेते)
4)राजरत्न आंबेडकर(दलित नवबौध्द नेते)
6)बाळासाहेब सराटे (मराठा आरक्षण अभ्यासक )
7)इम्तियाज जलील (मुस्लिम नेते)
8) संभाजी राजे छत्रपती (राजघराणे )
9)विनोद पाटील (मराठानेते)
10)राजेंद्र कोंडरे (मराठा )
11) राकेश टीकेत (राष्ट्रीय शेतकरी नेते)
12)प्रसंगी प्रकाश आंबेडकर नसते आले तरी , चंद्रशेखर आजाद यांना पाचारण करता आले असते !
14)आणि फुटलेले नेते + अपक्ष यांना मिळून पक्ष स्थापन करण्याची संधी जारांगे पटलांकडे नक्कीच होती..
शिवाय ज्याठिकाणी आपली ताकद नाही त्याठिकाणी मराठवादि भूमिका घेणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा दिला जाऊ शकत होता ..
एकूण 100 जागावर फोकस करून 50 जागा सहज विजयी होणे शक्य होते ..
1) मराठवाडा 50 जागा
2) विदर्भ बचू कडू + मुस्लिम+ दलित +स्थानिक पातळीवरील बंडखोर यांची मोट बांधून 20 जागा लढवल्या जाऊ शकल्या असत्या..
3) सोलापूर शहर आणि ग्रामीण मिळून 5-6 जागा ...
4)कोल्हापूर + सांगली +सातारा प्रत्येकी 5 जागा..
5)नगर +नाशिक+खानदेश 15 जागा
पुणे +मुंबई ठिकाणी 10 जागा आशा मिळून 100 जागा लढवल्या गेल्या असत्या तर , 50 जागा जिंकणे शक्य होते असे माझे प्रामाणिक मत होते.
जारांगे पाटलांच्या समोरील सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुस्लिम +मराठा+ दलित यांच्या मनामध्ये आपण जिंकू ही भावना निर्माण करणे हेच होती..जलील , राजरत्न आंबेडकर ,चंद्रशेखर आजाद , राजू शेट्टी , जानकर , दीपक केदार, संभाजी छत्रपती या सर्वांना एकत्र आले असते तर हे सहज शक्य होत..
OBC समाजात महादेव जानकर यांच्या माध्यमातून फूट पाडणे सहज शक्य होते .
:आश्वासनांचा पाऊस पाडणे सहज शक्य होते ?
आमची सत्ता आली तर ,
1) दुधाला 35-40 रुपयांचा भाव देऊ.
2)कांद्याला , कापूस , तूर , मुगाला हमीभाव देऊ.
3) मराठा विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसाहती गृह बांधू..
4) शेतकरी कर्जमाफी करू !
5) शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करू !
6) मुस्लिम आरक्षण देऊ..
7) ऊस पिकाला 3500-4000 भाव देऊ!
8) धरणे उभारणी करू !
9) धनगर समाजाला आरक्षण देऊ !
10)गॅस सिलेंडर 500 रुपयांमध्ये देऊ !
11 ) शेतकऱ्यांना पेरणी वेळी 10000 रुपयांची रोख रक्कम देऊ !
12) मजूर (गवंडी , बिगारी ,शेतमजूर ) यांच्या मजुरी मध्ये सरकार तर्फे वाढ करू )त्यांच्या मुलांचं शिक्षण फुकट करून देऊ ..
अशी अनेक आश्वासने देने सहज शक्य होते , आश्वासने पूर्ण होऊ अथवा नाही पण ती देणं गरजेचं असत ..
एकूणच शरद पवार, अजित पवार ,फडणवीस, एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरे या सर्वांचा राजकारण संपवण्याची संधी जारांगे पाटलांनी घालवली
तूम्हाला या विषयाबद्दल काय वाटत हे comment मध्ये नक्की कळवा !
Thank you !😊
100% सहमत!
ReplyDeleteआभारी आहोत ...😊
ReplyDelete