Skip to main content

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत .. 

                         मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...
               

          महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाचे प्रमाण कमी। झाले आहे , या गोष्टी राजकीय पक्षांनी कधीच समजून न घेता वापर केला , या सर्व गोष्टी मूळ मराठा समाजाला वाटू लागले की आपला पण पक्ष असावा , मुळात या भावनेची सुरुवात 10 वर्षांपूर्वी झालेली होती..

       --------जारांगे पाटील यांना ती संधी नारायणगड  येथील दसरा मेळावा च्या प्रसंगी आलेली होती..
१) दूध उत्पादक शेतकरी
2) पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी.
3)उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी.              4) ऊसतोड मजूर..
5) विद्यार्थी
6)मजूर
7)स्त्रिया
8) महागाई
9)मराठवादी भूमिका
10) पाणी प्रश्न 
11) भ्रष्ट्राचार 
12) मराठी शाळा
यासर्व अडचणींचा उपाय महाराष्ट्रा कडे नव्हता , जारांगे पाटलांच्या निमित्ताने तो पर्याय महाराष्ट्राला भेटला असता !

:पक्षाची मोट बांधण्याची ही सुवर्ण संधी पाटलांकडे होती !

 जारांगे पाटील (अध्यक्ष )

१) बचू कडू (कुणबी आणि शेतकरी नेते)
2) राजू शेट्टी (जैन आणि शेतकरी नेते)
3)महादेव जानकर (धनगर नेते)
4)राजरत्न आंबेडकर(दलित नवबौध्द नेते)
5)दिपक केदार (दलित नेते)
6)बाळासाहेब  सराटे (मराठा आरक्षण अभ्यासक )
7)इम्तियाज जलील (मुस्लिम नेते)
8) संभाजी राजे छत्रपती (राजघराणे )
9)विनोद पाटील (मराठानेते)
10)राजेंद्र कोंडरे (मराठा )
11) राकेश टीकेत (राष्ट्रीय शेतकरी नेते)
12)प्रसंगी प्रकाश आंबेडकर नसते आले तरी , चंद्रशेखर आजाद यांना पाचारण करता आले असते !
13)भ्रष्ट्राचार आणि शहरी मुद्यावर आम आदमी पार्टी ची मदत घेता आली असती .

14)आणि फुटलेले नेते + अपक्ष यांना मिळून पक्ष स्थापन करण्याची संधी जारांगे पटलांकडे नक्कीच होती..
                       शिवाय ज्याठिकाणी आपली ताकद नाही त्याठिकाणी मराठवादि भूमिका घेणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा दिला जाऊ शकत होता ..
एकूण 100 जागावर फोकस करून 50 जागा सहज विजयी होणे शक्य होते ..

1) मराठवाडा 50 जागा
2) विदर्भ बचू कडू + मुस्लिम+ दलित +स्थानिक पातळीवरील बंडखोर यांची मोट बांधून 20 जागा लढवल्या जाऊ शकल्या असत्या..
3) सोलापूर शहर आणि ग्रामीण मिळून 5-6 जागा ...
4)कोल्हापूर + सांगली +सातारा प्रत्येकी 5 जागा..
5)नगर +नाशिक+खानदेश 15 जागा 

पुणे  +मुंबई ठिकाणी 10 जागा आशा मिळून 100 जागा लढवल्या गेल्या असत्या तर , 50 जागा जिंकणे शक्य होते असे माझे प्रामाणिक मत होते.
         

          जारांगे पाटलांच्या समोरील सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुस्लिम +मराठा+ दलित यांच्या मनामध्ये आपण जिंकू ही भावना निर्माण करणे हेच होती..जलील , राजरत्न आंबेडकर ,चंद्रशेखर आजाद , राजू शेट्टी ,  जानकर , दीपक केदार, संभाजी छत्रपती या सर्वांना एकत्र आले असते तर हे सहज शक्य होत..

                     OBC समाजात महादेव जानकर यांच्या माध्यमातून फूट पाडणे सहज शक्य होते .

:आश्वासनांचा पाऊस पाडणे सहज शक्य होते ?

आमची सत्ता आली तर ,
1) दुधाला 35-40 रुपयांचा भाव देऊ.
2)कांद्याला , कापूस , तूर , मुगाला हमीभाव देऊ.
3) मराठा विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसाहती गृह बांधू..
4) शेतकरी कर्जमाफी करू !
5) शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करू !
6) मुस्लिम आरक्षण देऊ..
7) ऊस पिकाला 3500-4000 भाव देऊ!
8) धरणे उभारणी करू !
9) धनगर समाजाला आरक्षण देऊ !
10)गॅस सिलेंडर 500 रुपयांमध्ये देऊ !
11 ) शेतकऱ्यांना पेरणी वेळी 10000 रुपयांची रोख रक्कम देऊ !
12) मजूर (गवंडी , बिगारी ,शेतमजूर ) यांच्या मजुरी मध्ये सरकार तर्फे वाढ करू )त्यांच्या मुलांचं शिक्षण फुकट करून देऊ ..

अशी अनेक आश्वासने देने सहज शक्य होते , आश्वासने पूर्ण होऊ अथवा नाही पण ती देणं गरजेचं असत ..
 

              एकूणच शरद पवार, अजित पवार ,फडणवीस, एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरे या सर्वांचा राजकारण संपवण्याची संधी जारांगे पाटलांनी घालवली
तूम्हाला या विषयाबद्दल काय वाटत हे comment मध्ये नक्की कळवा !


Thank you !😊

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जारांगे पाटलांचा अखेर विजय ! कसा ?

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच  रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे .. याची आपण कारणे पाहणार आहोत ...          काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..                         यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल .. या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत.. for video click Here लक्ष्मण हाके यांच्या बोलण्...

हे 2 शब्द मराठा आरक्षणाचा GR मधून नाही काढले तर तहात हार 100% होणार !

मनोज जारांगे पाटील यांनी 3 सप्टेंबर रोजी GR विखे पाटील आणि बाबराजे भोसले यांच्या हस्ते घेऊन मुंबईतील ऐतिहासिक आंदोलन माघे घेण्यात आहेत.. पण , GR मधील काही शब्द हे जाणून बुजून टाकण्यात आलेले आहेत ते काढले तरच हैद्राबाद गॅझेट चा मराठ्यांना आरक्षणासाठी फायदा होणार आहे .. मराठा असाल तर नीट वाचा ! हैद्राबाद गॅझेट 1909 स्पष्टीकरण -ह्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे ...शेती कसणाऱ्या जाती ची संख्या 1.71000 आहे या मध्ये मराठा कुणबी (*कापू ) म्हंटल आहे हे 1.29000 हजार आहेत म्हणजे 26% पण , सरकारने 2 september च्या GR मध्ये काहीही गरज नसताना 1921 आणि 1931 चा उल्लेख केला आहे ..तो दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.. बाकी जवळ जवळ सर्व गोष्टी बरोबर आहेत जस  की गावमध्ये आता ग्रामसेवक , तलाठी , हे कुणबी नोंदीची प्राथमिक वितरणाची जबाबदारी दिली आहे सरकार , कुणबी नोंदी ग्रामपंचायत मध्ये लावणार आहे... शेवटी , कुणबी प्रमाणपत्र कुळातील माणसांना मिळवण्यासाठी ,ज्याकडे कुणबी आहे त्या बांधवाने प्रतिज्ञापत्र देने गरजेचं आहे ... ते ठीक आहे  पण 1921 आणि 1931 च्या जागी स...

पुण्यामध्ये घर कर्ज घ्यायचे आहे ? पण सॅलरी स्लिप किंवा ITR नाही , तरी पण ही कंपनी तुम्हाला कर्ज 100% देईल !

🏙️ पुण्यासारख्या शहरात स्वतःचं घर घेणं — प्रत्येकाचं स्वप्न! पण सॅलरी स्लिप, ITR नसलेल्या मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांसाठी हे स्वप्न अपूर्णच राहतं... कारण सरकारी व मोठ्या बँका "ना" म्हणतात. 📢 पण आता काळजी करण्याचं कारण नाही! गेल्या 15 वर्षांपासून, 140+ शाखा, 1 लाखांहून अधिक समाधानी ग्राहक, आणि फक्त 48 तासांत गृहकर्ज मंजूरीची हमी देणारी कंपनी घेऊन आली आहे तुमच्यासारख्यांसाठी खास योजना! 👨‍💼 प्रत्येक ग्राहकासाठी: • स्वतंत्र रिलेशनशिप मॅनेजर • घरपोच सेवा • 90% पर्यंत Loan-to-Value (उदा. ₹30 लाख प्रॉपर्टी साठी ₹27 लाख कर्ज) - प्रधानमंत्री PMAY सबसिडी 2.50 लाखापर्यंत .. 💼 खास कोणी साठी? • Swiggy/Zomato डिलिव्हरी बॉय • फळ-भाजी विक्रेते • वडापाव/चहाचे दुकानदार • छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगार करणारे • सॅलरी स्लिप/ITR नसलेले कुटुंबीय 👪 कंपनी कुटुंबाचे एकूण उत्पन्न ग्राह्य धरते! उदा. वडील पेन्शन ₹15,000 मुलगा चहाचा गाडा ₹20,000 पत्नी घरकाम ₹15,000 ➡️ एकूण ₹50,000 ग्राह्य मानलं जातं! 📌 महत्त्वाचं: 1️⃣ कर्ज Mortgage स्वरूपात दिलं जातं (प्रॉपर्टीच्या नावे) 2️⃣ 50 ते 60 लाखांपर्यंत कर्...