Skip to main content

ब्राह्मण होणं बहुजनांसाठी अवघड नव्हे ! अशक्यच ?

आज काल आपण जो कोणी येतोय ब्राह्मण समाजाचा समाचार घेऊन जातोय ' ब्राह्मण समाजाची अवस्था आज " देवळातल्या घंटी सारखी झालीये " जो येतोय तो वाजवून जातोय .डाव्यांना ब्राह्मण म्हणजे जनू काय "बाहुलीच" हवी तशी मारावी , पाडावी , तोडावी , त्यात आंबेडकरी चळवळ , समता मंच , संभाजी ब्रिगेड , बामसेफ , वंचित आघाडी , आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणजे , काही अंशी मराठा समाज पण , आपला हात ब्राह्मणांवर  धुवून घेणार ..पण ब्राह्मण या कोणत्याची टीकाकारांना होता येन अवघडच !! कारण ..

       1) ज्ञानसाधना फक्त ब्राह्मण समाजातच !
        2) पूर्ण शाकाहारी जेवण !
        3) देव धर्म ,परंपरा चा आदर !
        4) शिक्षण ,गायन , वादन , धंद्या मध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर !
        5) मितभाषी स्वभाव !

1)) ज्ञानसाधना फक्त ब्राह्मण समाजातच !


ज्ञानसाधना म्हणजे कोणत्याची विषयामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जाणे , थोड्यात गावातल्या भाषेत " 'खोलातला खोल अभ्यास " ब्राह्मण समाजामध्ये विविध लेखक , काव्यरचना कार  (  सावरकर , कुसुमाग्रज ,पूल , ) नेते( SM जोशी , शरद जोशी ,अटल बिहारी , लोकमान्य , ) पत्रकार (रानडे आगरकर ) Ias अधिकारी (अविनाश धर्माधिकारी ) इतिहास लेखन (बाबासाहेब पुरंदरे ,राजवाडे , सरदेसाई  )  अशी किमान 1000 नावांची महाराष्ट्रापुरती यादी निघू शकेल ..
ब्राह्मण समाजामध्ये  ज्ञानसाधने ची खूप जुनी परंपरा आहे , कुणब्याची जस नात शेतीसोबत ,सुताराची जस नात लाकडासोबत , न्हाव्याचं जस नात कात्री सोबत , तस बामनाच नात शिक्षणासोबत...
2000 वर्ष भारतामध्ये बहुतांशी भागात शिक्षणावर वर्चस्व राहिले आहे...यातूनच आजतागायत ब्राह्मण समाज शिक्षणासोबत हे नाते जपत आला आहे ..

2) पूर्ण शाकाहारी जेवण !

आज पण ब्राह्मण समाजात अंडी ,  मटण , मासे, वर्ज आहेत ,अनेक ब्राह्मण खातात सुद्धा , त्यामुळेच "ब्राह्मनांनी मटण महाग केलं " अशी अशी पुण्यात प्रसिद्ध म्हण आहेत , पण 90% खात नाहीत असा माझा तरी अंदाज आहे , कांदा ,लसूण , आणि कमी मीठ आणि चटणी असणार सात्विक ,हलक जेवण , ब्राहमण  समाजाला बहुजना पासून  वेगळं करत .चांगल्या , सात्विक जेवणाचा बुद्धीवर ,आणि शारीरिक अनेक फायदे आहेत ला नाहीत हे मला माहित नाही , पण तज्ञ मंडळी नक्की सांगतील ! 


3)  देव धर्म ,परंपरा चा आदर !

ब्राह्मण समाजाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे देव , धर्म ,परंपरा, यांचा कायम आदर या समाजाने केला , आणि बहुजनांना शिकवला सुद्धा ,चांगल्या किंवा वाईटा मध्ये मला जायच नाही , पण आज पण कितीही मोठा ब्राह्मण समाजाचा माणूस असला तरी , देवा प्रति कायम श्रद्धा बाळगून असतो, सकाळी नित्यनियमाने देवाची पूजा करणे ,संस्कृत मंत्र म्हणणे ,अंगारा लावणे , आरती करणे ही देवाची आज पण सेवा या समाजाकडून होते.

४) शिक्षण ,गायन , वादन , धंद्या मध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर !


या बाबतीत ब्राह्मण समाजाचा भारतात कोणताही समाज स्पर्धा करू शकत नाही..आरक्षण नाही, सोयी नाहीत तरी आज ब्राह्मण समाजाची मुलं अमेरिका ,ऑस्ट्रॉलीया, जपान , ब्रिटन , कॅनडा , दुबई ,या ठिकाणी स्वतः च्या गुण , आणि कर्तृत्वामुळे गेलेली आहेत ..इंजिनिअर नंतर अमेरिकेत MS चा शिक्षण पूर्ण करून तिथं स्थायिक सुद्धा झालेली आहेत.


          गायनामध्ये आणि वादन या क्षेत्रात ब्राह्मण मुले आघाडी वर आहेत ..,घरात मुलांना एक तरी आवड म्हणून गायन , वादन ,नाटक ,यासर्वांचे classes लहान असताना मुलांना लावताना ब्राह्मण समाजात खूप छान परंपरा आहे..
             आणखी एक वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे ब्राह्मण समाजाने वेळे प्रमाणे आपली क्षेत्रे बदलली आहेत..पेशवाई मध्ये तलवारी सुद्धा उचलल्या ,प्रसंगी शेती ,नाटक आणि tv सिरीयल क्षेत्रात , नंतर 1990 इंजिनिअर करून ms अमेरिकेत , आता गेल्या 5-10 "वर्षांपासून लहान मोठ्या धंद्यात सुद्धा ...


ना कधी आरक्षणाची तक्रार , ना कधी सोयी नाहीत म्हणून तांडव ,कष्ट , बुद्धी , आणि कर्तृत्वाच्या जोरावर आजपण 60% Ias ब्राह्मण ,80% कॅबिनेट secretory ब्राह्मण , वकिली  मध्ये 78% , देशात आज 2% समाज असून 5-6 ब्राह्मण मुख्यमंत्री , आणि उद्योगामध्ये अनेक billonier आहेत ..


5) मितभाषी स्वभाव !


ब्राहमण म्हणलं तर ,मितभाषी ,सुस्पष्ट भाषा , तथाकथित शुद्ध भाषा ,अनुस्वार ,वेलांट्या ह्यांचा योग्य वापर ,

ह्या सर्व गोष्टी माझ्या मते बहुजनासाठी खूप अवघडच ..
तूमचा अभिप्राय नक्की comment मध्ये कळवा !

Comments

Popular posts from this blog

एक एकरात हा धंदा करून कमवा 50000 महिना !

आज शेतकऱ्यांची पोर संभ्रमाच्या अवस्थेत आहेत शेतीला भाव नाही ! नोकरी नाही ! कराव तर काय करावं ! हा मोठा गहन प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांच्या समोर आहे...यासाठी पर्याय आणि शेतीचे भविष्य पाहून मी a  हा" business plan " शोधला आहे ..                    यासाठी आपल्याला 1) 1 एकर सुपीक जमीन ,  2) ठिबक सिंचन ,  3) 200 कॅरेट 4) किमान 10 गुंठामध्ये polyhouse , सुरुवातीच्या एक वर्षात नसेल  तरी चालेल, पण दुसऱ्या वर्षापासुन हवाच .. 5) social media instagram, facebook ,email marketing  करता याव!  6)लहान रोटावेटर.. 7) छोटा हत्ती टेम्पो  8) शेणखत / कोंबडीखात/ लेंडीखात  9) काही पिकांसाठी कुंड्या किंवा प्लॅस्टिक कुंड्या लागतील. 10) गावरान बी (देशी बियाणे ) 1) सुरुवातीला एकर क्षेत्रावर नांगरणी , करून 3 टायली शेणखत टाकून घ्यावा ... 2) नंतर , 1 एकर (म्हणजे 40 गुंठे ) या सर्वांचे 9×5 गुंठे = बरोबर 45 गुंठे याप्रमाणे 9 भाग पाडावे ... 3) त्यानंतर कोथींबीर , शेपू , वांगी ,दोडका , कांदा , ...

मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चूक जारांगे पाटलांच्या मुळेच ?

महाराष्ट्रात गेल्या 1 वर्षांमध्ये एक नाव खूप चर्चा झाली आणि आहे , ज्या नावाने लोकसभेला मोदींना सुद्धा शह दिला, भाजप चे कमळ मराठवाड्यात नाहीसे केले ,पण त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस , शरद पवार, उद्धव ठाकरेंना नवसंजीवनी मिळाली , मराठा समाजाला 10 लाख कुणबी प्रमाण भेटली , मराठवाद या नव्या संकल्पनेचा महाराष्ट्रात उदय केला ,ते मनोज जारांगे पाटलांकडून मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक कशी झाली ते पाहणार आहोत ..                           मराठा समाजाला कायम शरद पवार आणि काँग्रेस ने '' टोपल्यातली भाकरी:' समजून वापर केला तर , शिवसेना आणि भाजप ने हिंदुत्वाच्या "गाड्याला ओढणारा बैल समजलं " गरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी दोन्हीकडून  आर्थिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाला नाही ...                           महाराष्ट्रात 35% असणारा मराठा समाज  90% अल्पभूधारक आहे ,शेती वर अवलंबून आहे , शिक्षण नोकऱ्या मध्ये या समाजाच...

माझ्य ा पहिल्या जॉबच्या २ वर्षात शिकलेलो १० गोष्टी मनातल्या !

मी १९ वर्षाचा असेल जेम तेम, सोलापूर मध्ये शिकायला गेलो होतो . लहान पनी पासून मला एक जिज्ञासा असायची की , नक्की नोकरी कशी असते ?  काय करतात तेथे ? Manager म्हणजे काय ? आणि असच जॉब शोधत शोधत एक जॉब सापडला ..naturals ice-cream खर तर आइस्क्रीम च्या दुनियेतील बापमाणूस ब्रँड आहे , ह्याची मला कल्पनाच नव्हती ! मला वाटलं साधं आइस्क्रीम च दुकानाच असेल ! मुळात मी गावाकडचा असल्यामुळं CV म्हणजे काय ? हे सुद्धा माहीत नव्हता . पलीकडून एका मुलीचा फोन आला ' ती म्हणाली ' चेतन बोलताय का ?' मी बोललो ' ' 'हो ' ही माझी पहिली जॉब मधली शिकवण ठरली.. कितीही लहान किंवा मोठा customer असूद्या ' तुम्हाला as a manager / employee खालच्या आवाजात बोलायचं आहे . ती मॅडम म्हणाली ' तुमच्या इंटरव्ह्यू ची वेळ ठीक दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ठेवली आहे , येताना आपला cv घेऊन या ! आणि फोन ठेवला . तेव्हा दुपारचे जेमतेम १२ वाजले असतील , मी घाईघाईत एका झेरॉक्स च्या दुकानात गेलो आणि सांगितलं , दादा मला एक CV बनून द्या ! त्याने २ मिनटामध्ये cv बनून दिला ! कारण त्यात लीहण्यासारख काहीच नव...