2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला , महायुती ला भरभरून यश , त्यामध्ये भाजप ला 135 जागा म्हणजे स्पष्ट बहुमतच जनतेने हिंदुत्वाच्या , विकासाच्या , सुरक्षेच्या मुद्द्यावर दिले .देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले ..याचा सोपा आणि सरळ अर्थ म्हणजे नवबौध्द आणि मुस्लिम समाजाची हजामत आणि नाकेबंदी वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात होणार नव्हे झाली आहे..
पहिली घटना , 2024 जाता जाता परभणी मध्ये दंगल झाली असता " कॉम्बिग operation " झालं घरातून बाहेर काढून नवबौध्द तरुण, महिलांना बेदम मार देण्यात आला .मी मान्य करतो की चूक समाजाची पण होती ,पोलिसांच्या गाडीवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करायला नको होती...या combing opration मध्ये अनेकांची डोकी फुटली, गाड्या पोलिसांनी फोडल्या , आणि ''सूर्यवंशी '' नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला..
दुसरी घटना , अष्टविनायका पैकी एक असणाऱ्या ''सिद्धटेक '' येथे (18/1/2025 )भर दिवसा मुस्लिम समाजाची एक कबर हिंदुत्ववादी जमावाने , (संघटनेने ) तोडून विडिओ viral करण्यात आला ..भले ती कबर अनधिकृत असेलही , याचा अर्थ कायदा हातात घेणे योग्य आहे का ? लोकशाही देश आहे ना आपला ? हा प्रश्न पडावा अशी सगळी परिस्थती...आज जमाव कबरेवर उद्या मशिदीवर ?
" त्यामुळेच सावधान नवबौध्द आणि मुस्लिम "
हे दोन्ही समाज भाजपला कायम विरोध करणारे , भाजप विरोधी विचारधारा बहुदा अतिरेकी किंवा अतिशयोक्ती विचारधारा जोपासणारे समाज
..देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेट वर असलेले पहिला मिळतात ...मग ती आरक्षणाची विभागणी असो , शिष्यवृत्ती असो वा , शहरी नक्सल वादाच्या नावावर अटक वा " आर्टी " ची स्थापना आणि मातंग नेत्यांना पद , प्रतिष्ठा , देऊन आंबेडकरी चळवळीपासून दूर केलेले प्रयत्न असो, वा 2018 साली भीमा कोरगावची दंगल असो , जे जे आंबेडकरी समाजाला टार्गेट करतात त्यांच्या पाठीशी देवेन्द्र फडणवीस कायम उभे राहिलेले दिसतात...(संभाजी भिडे, एकबोटे)
आंबेडकरी समाजाला पद्धतशीरपने एकटे पाडण्याच काम दोन्ही बाहूंनी सामाजिक आणि आर्थिक बाजूंनी नाकेबंदी भाजपने केलेली पाहायला मिळते ..
डिसेंबर मध्ये पुण्यामध्ये "book फेस्टिव्हल " होता त्यावेळेस उजव्या शक्तीने खूप शक्ती लावलेली होती, विरोधात डावी चळवळी कडून आंबेडकरी समाजाकडून पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळाले...यातूनच आंबेडकराना Obc , मराठा ,इतर sc /st पासून दूर करून" आपण सर्व कसे हिंदू आहोत ."हे पटवून देण्यास यश आले .
यापेक्षा वाईट अवस्था मुस्लिम समाजाची आहे..शहरांचे नाव बदल , विशाळगडावर मजीद मोडणे असो , वक्फ बोर्ड असो..मुस्लिम समाज कायम फडणवीस यांच्या टार्गेट वरच या दोन्ही समाजाने सावधान राहणं गरजेचं आहे , कारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आर्थिक , सामाजिक ,शैक्षणिक , राजकीय, कायदेशीर , या सर्व बाजूंनी नाकेबंदी पुढच्या 5 वर्षांत होणार आहे..
त्यामुळे संविधान मार्गाचा अवलंब आंदोलन करताना करावा , आणि सरकार च्या प्रत्येक GR वर लक्ष ठेवावा... कारण
Comments
Post a Comment