आज आपण भारत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना फक्त एका विशिष्ट पद्धतीने पोट्रेट करून दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.आणि छत्रपती कसे कट्टरवादी होते हे बिंबवले जात आहे पण विद्यार्थ्यांनी खासकरून विद्यार्थ्यांनी नक्की शिवचरित्रातून leadership , मानजमेंट , negotiations , staff retention , family ,यासर्वातून काय घ्यावं याची चर्चा होताना दिसत नाही !
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbX31QUifkLaW6R5ul9YdR1aWFv2zA50H2YnPpRE3Zk6pv7A/viewform?usp=sharingplease fill form
1) leading by example !
1) leading by example !
2) no excuses over core values !
3) respect to women's !
4) start at least small business !
5) self respect over all !
6) staff retention tricks !
7) The master of negotiation !
8) impeccable character
9) believing in own strengths !
10) tit for tat !
अफजल खानने जेव्हा स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा , शिवाजी महाराज स्वतः प्रतापगड उतरून अफजलखानाला भेटायला गेले, समोर बलाढ्य अफजलखान असताना महाराजांनी जे धैर्य दाखवलं ते वाखाणण्यासारखी बाब आहे ..
यानंतर , जेव्हा पन्हाळा गडाची लढाई मध्ये महाराज स्वतः चिलखत घालून , ढाल घेऊन लढल्याचे तात्कालिक पुरावे आपल्याला भेटतात ..
शिकवण - लीडर ने जर स्वतः मैदानामध्ये उतरून काम केलं तर , टीम मध्ये कॉन्फिडन्स येतो , आणि काम जोमाने करण्याची ऊर्जा भेटते ..
2) core values आणि regulations शी तडजोड नाही !
महाराजाच्या दरबारातून एक माणूस स्वराज्याला फितूर होऊन , औरंगजेबकडे गेला आणि काही दिवसांनी परत आला असता त्या माणसाने दरबारातील " सुरणीस यांचा वशिला लावून त्यांच्या कर्वे महाराजांनी माफी द्यावी अशी विनवणी केली , आणि महाराजांनी त्याला दरबारात बोलवले , तो आला असता महाराजांनी त्याचा "डावा हात आणि उजवा पाय " कापायची शिक्षा दिली . नंतर सुरनीसांनी महाराजांना सांगितलं की अस का केलं ? महाराज तेव्हा म्हणाले फितुरांना कधीही माफी नाही आणि तुमची (सूरनिसांची ) ओळख सांगितली म्हणून फक्त 1 हात 1 पाय कापला , नाहीतर 2 पाय आणि 2 हात कापले असते ..
शिकवण - As a manger / leader जेव्हा तुम्ही कामाला असला तर , जर कोणी core value शी तडतोड केली तर , अजिबात दया करू नका . कारण तुम्ही माफी दिली तर उद्या हा पायंडा तसाच चालू राहील आनि एकूणच कंपनी चे आणि सोबत स्वतःचे नुकसान होईल...
3) स्त्रियांचा आदर !
महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात कधी ची लावणी , बाया नाचविल्या असले प्रकार पहिला मिळाले नाहीत .
आपल्याला एका मुली , वर एका पाटलाने व्यभिचाराचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर , शिवाजी महाराजांनि त्याचा चौरंग केला होता अशी नोंद आहे ..
शिवाजी महाराजांच्या काळात परकीय स्त्रियांवर मराठा सैन्याने कधी बलात्कार केलेले एकही उल्लेख आढळत नाही ..
4) स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा
शिवचरित्रा तील सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे लहान का असेना स्वतःचा व्यवसाय सुरू करा ...
कारण शिवरायांचे वडील शहाजी महाराज सुद्धा आदिलशहा कडे कर्नाटक मध्ये चाकरी करत होते .."
पुणे ही शहाजी राज्यांना जहागीर भेटली होती पण ,शिवाजी महाराजांनी पुढे चाकरी न करता , सुरुवातीला स्वतःच लहान स्वराज्य ' उभा करण्याचा संकल्प केला ..
आणि कालांतराने स्वराज्याच रूपांतर साम्राज्यात झालं ..अटक ते कटक "
आज महाराष्ट्रा मध्ये आणि मुंबईमध्ये मराठी माणसाची वाईट अवस्था होण्याच्या माघे , मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय न सुरू केल्या मुळे , गुजराती , मारवाडी ,जैन समाजाने मोठे उद्योग सुरू करून , मराठी माणसाला राजकारण , समाजकारण ,अर्थकारण ,या सर्वामध्ये माघे टाकले ..
4) स्वाभिमान !
महाराजांनी मराठी माणसांना आणि या देशाला self respect म्हणजे काय असत ते आग्र्यामध्ये आलमगीर औरंगजेब बादशहाला दाखवून दिले ..
आपला आवाज आपल्या पेक्षा मोठ्या माणसावर चढवावा तर त्याला सेल्फ रेस्पेक्ट म्हणतात .हे महाराजांनी दाखवून दिले ...
शिकवण - आज काम करताना हो ला हो मिळण्याची नवीन पद्दत आली आहे...
आपला आवाज आपण कायम आपल्या पेक्षा कमी हुद्यावर असणाऱ्या लोकांवर चढवतो ..
पण आपल्या पेक्षा अधिक मोठ्या माणसावर तो आवाज अन्याय झाल्यानंतर चढवण्याची शिक्षण शिवाजी महाराजांनी दिलेली आहे ..
6) स्टाफ retention
आज आपण पाहतोय , 6 महिने 1 वर्ष पूर्ण झालंयनर employee switch मारतात ,आणि hr पुढे कायम प्रश्न असतो की स्टाफ retenstion कस करायचं ?
महाराज लढाई जिंकल्या नंतर :
सैनिकांना सोन्याचे कड भेट देत असत , ढाल , नंतर तलवार , किंवा मोहरा , देऊ सन्मान केल्यामुळे मावळ्यांना कधी फितूर व्हावे असे वाटत नसे ..
लढाईत हारल्यानंतर :
जर कोण मावळा स्वराज्यासाठी कामी आला तर महाराज स्वतः त्याच्या घरी जाऊन सांत्वन करत असत ..आणि त्याचा पगार आणि त्याच्या कुटुंबाची सर्व प्रकारच्या सुविधा शासनातर्फे दिल्या जात ..
आज पण ey कंपनी मध्ये एक मुलगी मेल्यानंतर सुद्धा मॅनेजर , statff , ceo कोणीच सांत्वन करायला जात नाही हे आपण पाहिलं आहे ..
7) निष्कलंक चारित्र्य
आज आपण 2025 मध्ये जगत आहोत ..400 वर्षांपूर्वी शिवरायांनी दाखवलेले मार्ग आजपण आपण mba चे विद्यार्थी म्हणून वापर करू शकतो..
उभ्या आयुष्यात महाराजांवर कधीच त्यांच्या चरित्रावर मद , मत्सर , काम , क्रोध , यांच्यातील कशाचाच डाग लागला नाही ,
शिकवण - कामावर मॅनेजर जर निष्कलंक असेल तर , बाकी emoloyee त्यांना मान आणि आदर करतात..
वेळेवर न येणे , स्त्रियांचा आदर न करणे , दारू पिणे , मत्सर असणे , हे दुर्गुण असतील तर , leader म्हणून acceptibility येत नाही ,हे आपण पाहतो ..
8) वाटाघाटी चे धोरण !
महाराजांच्या संबंध आयुष्यात वाटाघाटी चा खूप मोठा प्रभाव आहे ,
जयसिंगच्या12000 सैन्याच्या स्वारीच्या वेळी महाराजांना 23किल्ले गमवावे लागले , पण महाराजांनी त्यावेळी लढाई करण्याची चूक केली नाही , स्वराज्याचे पैसे , आणि मावळे महाराजांनी खर्ची पडून दिले नाहीत , आणि औरंगजेबाशी लढाई करण्याची चूक केली नाही..
नाहीतर पूर्ण स्वराज्य खालसा होण्याची दाट शक्यता होती ..
- इंग्रज ,फ़्रेंच , dutch ,सिद्धी ,यांच्याशी व्यापारी संबंध ठेवताना महाराजांनि त्यांना डोक्यावर चढुन दिले नाही .
-आग्र्यावरून सुटका होताना महाराजांनी औरंगजेबाच्या मिरबक्षी , सेनानी , औरंजेबाच्या बायको शी , वाटाघाटी करून महाराज शितापीने बाहेर आहे..
9) स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवणे !
महाराजांनि कायम युद्ध करताना गनिमी काव्याचे धोरण अवलंबवले , आपल्या सैन्याची कौशल्य जाणून ,आपले resourses चा योग्य वापर करून , आपले मावळे मोकळ्या मैदानात मुघलांच्या तोफा , हत्ती , आणि बलाढ्य पाठणापुढे टिकाव धरू शकणार नाही , याची महाराजांना जाणीव होती , त्यामुळे मुघल सैन्याला आपल्या भागात बोलवून गनिमी कावा युद्ध पद्धत वापरून जेरीस आणले आणि जवळ जवळ 90 % योद्धे , वेढे , महाराजांनी जिंकले ..
आज management student साठी bullet हे उत्तम उदाहरण आहे..elelctric आणि slim गाड्यांच्या जमान्यात royal Enfield स्वतःचा वेगळेपण जपून आहे कारण स्वतःच्या strenth आणि weakness चा योग्य अभ्यास ..
10) जशास तसे उत्तर देण्याची तयारी !
महाराजांनी जशास तस उत्तर देऊन अनेक वेळा विरोधकांना जेरीस आणलं..
याचा उत्तम उदाहरण म्हणजे अफजलखान ने जेव्हा स्वराज्यावर चालून आल्यावर महाराजांनी स्वतः त्याला फाडून आदिलशाही आणि मुघलसाम्राज्य ला हादरून सोडलेले होते ..
यामध्ये धैर्य , संयम ,साहस , कुटीलता आणि बल या सर्वांचा वापर केला !
Comments
Post a Comment