डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व आणि लोकल व्यवसायांसाठी त्याचा उपयोग आजच्या 21व्या शतकात आपण पाहतो की दर 5-6 वर्षांनी नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानामुळे नवीन नोकऱ्या आणि व्यवसाय निर्माण होत असतानाच काही पारंपरिक व्यवसाय नामशेष होताना दिसतात. जसे की, 5-6 वर्षांपूर्वी आलेले Jio, त्यानंतर PhonePe, Google Pay आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डिजिटल मार्केटिंगने व्यवसाय जगतात दूरगामी बदल घडवले आहेत. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, 2025 मध्ये गावांतील तसेच शहरांतील लहान दुकानदारांना डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व समजले आहे का? डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? digital marketing infographics डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपला व्यवसाय ऑनलाइन माध्यमांतून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. यात खालील पद्धतींचा समावेश होतो – कंटेंट मार्केटिंग – व्हिडिओ, फोटो, ब्लॉगद्वारे व्यवसायाचा प्रचार ई-मेल मार्केटिंग – ग्राहकांशी थेट संपर्क साधून नवीन उत्पादने किंवा ऑफरची माहिती देणे सोशल मीडिया मार्केटिंग – इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे ब्रँड प्रमोशन Quora मार्केटिंग – प्रश्नोत...
my name is chetan , i am mba student and the son of farmer . in pune university , a student who like to write blogs on different topics like marketing , social issues , agriculture and stock market.